लऊळ येथे बाबासाहेबांना महापरिनिर्वाण दिनी अभिवादन

लऊळ (कालिदास जानराव)(क.वृ.): भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बोधिसत्व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना ६४ व्या महापरिनिर्वाण दिनी लऊळ ता.माढा येथे अभिवादन करण्यात आले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिर तसेच लऊळ ग्रामपंचायत कार्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. उपस्थितांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून त्रिशरण पंचशीलाचे पठण करून बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले.
यावेळी गावचे ग्राम विकास अधिकारी डी.एस.मोरे माजी ग्रा.प.स. दिनेश कांबळे, रंगकर्मी दत्ता वाघमारे, नागनाथ जानराव, माणिक भोंग अमित ऐदाळे,मधुकर जानराव,भाजपा शाखा अध्यक्ष संभाजी चव्हाण, पत्रकार दिनेश शिंदे, सुमित माळी, राजू कोळी, संतोष गवळी,कॉ. बाळासाहेब चांदणे,मंगेश जानराव, रवी जानराव, देवीदास जानराव, सुमेध जानराव, अमोल ऐदाळे, दिगंबर कबाडे, संभाजी चांदणे, रजनीकांत शिंदे, राजेश जानराव आदी उपस्थित होते.
0 Comments