महापरिनिर्वाण दिनानिमित्त रक्तदान शिबिर संपन्न ; १०६ जणांचे रक्तदान

रिपाइंच्या वतीने डॉ. आंबेडकरांना अभिवादन
कुर्डूवाडी(कालीदास जानराव)(क.वृ.): भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात १०६ रक्तदात्यांचा सहभाग लाभला. कुर्डुवाडी येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) यांच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रक्त संकलन बार्शीच्या राम भाई शहा रक्तपेढी मार्फत करण्यात आले.
रक्तदान शिबिराचे उद्घाटन माजी नगरसेविका जयश्री माने यांच्या हस्ते करण्यात आले. सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी आकाश जगताप, माजी नगरसेवक अमरकुमार माने,ॲड.हरिश्चंद्र कांबळे, प्रा.आशिष रजपूत,पश्चिम महाराष्ट्र सचिव एन.जी नाना ओहोळ, पप्पू भीसे, वसीम मुलाणी, स्टेट बँक मॅनेजर कांबळे, बंडू भोसले,राजेंद्र वजाळे, अमित ओहोळ, विशाल जगताप, शहर कार्याध्यक्ष नितीन खंडागळे, शरद शिंदे, नामदेव भोंग, आनंद रजपूत, अर्जुन गाडे, शिवाजी डांगे, श्यामराव कांबळे, मनसे शहर उपप्रमुख गणेश चौधरी, गोरख शिंदे, श्रीमंत वाळके, संजय तुपारे, रामचंद्र डांगे, हर्षद मुलाणी, शहराध्यक्ष बाळासाहेब शेंडगे, संजय सरवदे रोहन झिंगळे,बबन जगताप, गणेश समदाडे उपस्थित होते.
रक्तदात्यांसाठी व मान्यवर सत्कार मूर्तींसाठी कोरोना पार्श्वभूमीवर होमिओपॅथिक तज्ञ डॉ.मोहसिन मकनू यांच्या वतीने अर्सेनिक अल्बमच्या गोळ्याचे २०० व्यक्तींना मोफत वाटप करण्यात आले, तसेच रिपाइंच्या वतीने प्रत्येक रक्तदात्यांना वाफेची मशीन व कप सेट देण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी युवक आघाडीचे अध्यक्ष जितेंद्र गायकवाड,तालुका संघटक विशाल मोरे, अल्पसंख्यांक सेल उपाध्यक्ष इम्रान शेख, अखिल पानवाले, शहर सुरज कांबळे, रियाज शेख, जावेद शेख, कृष्णा गोरे, राकेश शिंदे, पप्पू थोरात यांनी परिश्रम घेतले.
0 Comments