Hot Posts

6/recent/ticker-posts

पोथरे निलज ग्रुप ग्रामपंचायत राष्ट्रवादी स्वबळावर लढवणार-शिवाजी जाधव

पोथरे निलज ग्रुप ग्रामपंचायत राष्ट्रवादी स्वबळावर लढवणार-शिवाजी जाधव

करमाळा (कटूसत्य. वृत्त.): पोथरे निलज ग्रुप ग्रामपंचायत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने स्वबळावर लढवणार असल्याची माहिती राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे तालुका अध्यक्ष शिवाजी जाधव यांनी दिली आहे.

या बाबत अधिक माहिती देताना ते म्हणाले की ,करमाळा तालुक्यात राष्ट्रवादी पक्ष वाढि साठी आम्ही गट-तट विसरून युवकांना स्थानिक स्वराज्य संस्थेत संधी मिळवून देण्यासाठी लढणार आहोत. राष्ट्रवादी पदवीधर मतदार संघाचे प्रदेश सदस्य नितीनभाऊ झिंजाडे यांच्या नेतृत्वाखाली आपण पोथरे निलज ग्रुप ग्रामपंचायत निवडणूक स्वतंत्र लढवणार असुन 13 पैकी 13 जागा स्वबळावर लढणार आहोत.

याबाबत ची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. पोथरे गावचा सर्वांगीन विकास करण्यासाठी आम्ही हि निवडणूक लढवणार आहोत.पोथरे येथे आजपर्यंत घरकूला शिवाय कुठलाच विकास केला सताधारी गटाने केला नाही.गावात विज,पाणी, रस्ते,गावाअंतर्गत गटारी,व्यावसायिक गाळे आजपर्यंत सत्ताधारी गटाला करता आली नाहीत. त्यामुळे गावातील तरुणांची फळी व जेष्ठांचे मार्गदर्शन आमच्या सोबत असुन आम्ही गावचा विकास करण्यासाठी  जास्तीत जास्त  तरुणांनाच संधी देणार आहोत व ग्रामपंचायत युवा कार्यकर्ते घेऊन राष्ट्रवादीचा झेंडा फडकवुन गावाचा सर्वांगीण विकास करणार आहोत. ग्रामस्थ आमचा विकासाभिमुख दृष्टिकोन समजून घेऊन आम्हाला नक्की संधी देतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Reactions

Post a Comment

0 Comments