Hot Posts

6/recent/ticker-posts

शेतकऱ्यांवरील खोटे गुन्हे मागे घेण्याच्या मागणीसाठीचे उपोषण दुसऱ्या दिवशी सुरूच

शेतकऱ्यांवरील खोटे गुन्हे मागे घेण्याच्या मागणीसाठीचे उपोषण दुसऱ्या दिवशी सुरूच

करमाळा (कटूसत्य. वृत्त.): शेतकऱ्यांवरील खोटे गुन्हे त्वरित मागे घेण्यात यावे, पोलीस निरीक्षक श्रीकांत पाडुळे यांची बदली करण्यात यावी व बीट अंमलदार हराळे यांची चौकशी करून त्यांना निलंबित करण्यात यावेत या मागण्यासाठी निमगाव (ह) येथील शेतकऱ्यांचे उपोषण दुसऱ्या दिवशीही सुरूच होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने या उपोषणाला पाठिंबा दिला असून विविध राजकीय सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन त्यांना आपला पाठिंबा दर्शवला आहे. याबाबत बोलताना उपोषण कर्ते शेतकरी मारुती निळ म्हणाले की निमगाव येथील सतीश नीळ  हा बाहेरचे गुंड आणून तसेच पुढाऱ्यांना हाताशी धरून नागरिकांना खोटे गुन्हे दाखल करून या परिसरात दहशत निर्माण करत आहे. सतीश नीळ हा गुंड प्रवृत्तीचा व्यक्ती आहे. त्याच्यावर पूर्वीच अपहरण, बलात्कार, हद्दपार यासारखे केसेस दाखल आहेत. याची चौकशी होऊन करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, करमाळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हे गुंड प्रवृत्तीच्या लोकांच्या पाठीशी राहून व राजकीय पुढाऱ्यांचे  ऐकून सर्वसामान्य शेतकऱ्या वर खोटे गुन्हे दाखल करण्याचे काम करत आहेत त्यामुळे त्यांची त्वरित बदली करण्यात यावी. तसेच बीट अंमलदार हराळे यांनी मौजे निमगाव येथील पाटील वस्तीवर जाऊन महिलांशी दमदाटी करून अर्वाच्च भाषा वापरून तुमच्या लोकांवर खोटे गुन्हे दाखल करतो असे म्हणल्याने त्या परिसरातील महिला भयभीत झाले आहेत. त्यामुळे त्यांची त्वरित चौकशी करून निलंबनाची कारवाई करण्यात यावी. तसेच मारुती नीळ व इतर शेतकऱ्यांवर दाखल असलेले खोटे गुन्हे त्वरित मागे  घेण्यात यावेत, या मागण्या मान्य न झाल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे असा इशारा मारुती नीळ यांनी दिला आहे.

या आंदोलनास करमाळा तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पाठिंबा दर्शवत सहभाग घेतला. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे. जिल्हा पक्षाध्यक्ष शिवाजी पाटील,जिल्हा समन्वयक परबती आदीनाथ,जिल्हा कार्याध्यक्ष रवींद्र आण्णां गोडगे‌, तालुका अध्यक्ष सुदर्शन शेळके, माढा ता.अध्यक्ष मेजर, ता. युवा अध्यक्ष अमोल घुमरे,ता पक्षाध्यक्ष बापू फरतडे, ता.उपाध्यक्ष तानाजी शिंदे  व स्वाभिमानी नेते दिपक शिंदे आदींनी उपस्थित राहून पाठिंबा दर्शवला.

Reactions

Post a Comment

0 Comments