Hot Posts

6/recent/ticker-posts

डिकसळ मध्ये शेकापला खिंडार..! ग्रा.पं.सदस्यांसह सोसायटीच्या चेअरमननी केला राष्ट्रवादीत प्रवेश

डिकसळ मध्ये शेकापला खिंडार..! ग्रा.पं.सदस्यांसह सोसायटीच्या चेअरमननी केला राष्ट्रवादीत प्रवेश

सांगोला (कटूसत्य. वृत्त.): ग्रामपंचायतीच्या निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या असताना डिकसळ ता. सांगोला येथील प्रस्थापित शेतकरी कामगार पक्षाला जबरदस्त धक्का देत विकास सेवा सोसायटीचे चेअरमन मुरलीधर करांडे मा. चेअरमन मारुती करांडे यांच्यासह विद्यमान ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय करांडे, व स्वानंद करांडे सर, सोमनाथ करांडे सर यांनी रविवार दि.20 रोजी जवळा येथे राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष मा.आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला.

सांगोला तालुक्यात नवीन नेतृत्वाच्या शोधात असलेल्या शेतकरी कामगार पक्षाला डिकसळ गावात जबरदस्त धक्का देत आगामी ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षातील मातब्बर नेते मंडळींनी एकाच वेळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केल्याने डिकसळ व परिसरात शेतकरी कामगार पक्षाला हा जबरदस्त धक्का मानला जातो. शेकापला खिंडार पाडत राष्ट्रवादी काँग्रेसने या परिसरात दिवसेंदिवस आपली ताकद मजबूत करण्यास सुरुवात केल्याने येणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला याचा मोठा फायदा होणार आहे. शेतकरी कामगार पक्षातून मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झालेल्या सर्व प्रमुख कार्यकर्त्यांचे दिपकआबा साळुंखे पाटील यांनी सत्कार करून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये स्वागत केले. यावेळी अशोक करताडे, उपसरपंच चंद्रकांत करांडे, ग्रामपंचायत सदस्य मधुकर करताडे, शिवाजी मुंजे यांसह डिकसळ परिसरातील ग्रामस्थ व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

दिपकआबांच्या सशक्त नेतृत्वाची तालुक्याला गरज
विकास सेवा सहकारी संस्था असो किंवा ग्रामपंचायत प्रत्येक निवडणुकीत तळागाळातील कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन त्यांना संधी देणाऱ्या व तालुका जिल्हा पातळीवर कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या मा आम दिपकआबा साळुंखे पाटील यांच्यासारख्या सशक्त व दमदार नेतृत्वची यापुढील काळात सांगोला तालुक्याला गरज आहे. म्हणूनच त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करीत आहोत. - मुरलीधर करांडे (चेअरमन, विकास सेवा सह.संस्था, डिकसळ)

Reactions

Post a Comment

0 Comments