डॉ. महेंद्र कदम यांची मराठी रंगभूमी परिनिरीक्षक मंडळाच्या सदस्यपदी निवड

टेंभुर्णी (कटूसत्य. वृत्त.): माढा तालुक्यातील वडशिंगे येथील रहिवासी व टेंभुर्णीच्या विठ्ठलराव शिंदे कला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.महेंद्र सुदाम कदम यांची महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिलेल्या आदेशानुसार महाराष्ट्र शासन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या मराठी रंगभूमी परिनिरीक्षक मंडळाच्या (सेंन्सार बोर्ड) सदस्यपदी निवड झाली आहे.
या मंडळावर शासनाने कला, नाट्य, साहित्य, चित्रपट व सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असणा-या 25 व्यक्तींची निवड केली आहे त्यामध्ये मराठी साहित्याच्या क्षेत्रात एक समीक्षक व लेखक आणि उत्कृष्ट कादंबरीकार म्हणून ओळख असलेले डॉ. महेंद्र कदम यांची निवड झाल्याने माढा तालुक्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.यापूर्वी त्यांची अनेक महत्त्वाच्या मंडळावर निवड झाली आहे तसेच अनेक जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय पुरस्काराने त्यांना सन्मानित केले आहे.विशेष बाब म्हणजे इयत्ता 10 वीच्या पाठ्यपुस्तकात " अगळ" नावाचा पाठ्यक्रम लावलेला आहे.या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन संस्थापक अध्यक्ष आमदार बबनराव शिंदे,आमदार संजयमामा शिंदे,जिल्हा परिषद सदस्य रणजितसिंह शिंदे, सभापती विक्रमसिंह शिंदे,पंचायत समिती सदस्य धनराज शिंदे,सचिव पोपट खापरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती सुहास पाटील, सचिव अजिनाथ बोंगाळे, जेष्ठ साहित्यिक डॉ.राजेंद्र दास,डॉ.रणधीर शिंदे,मुख्याध्यापक औदुंबर चव्हाण,आदर्श शिक्षक राजेंद्र गुंड,डॉ.नेताजी कोकाटे, डॉ.संतोष कदम,शहाजी कदम,सतीश गुंड यांच्यासह ग्रामस्थ व शिक्षकांनी केले आहे.
0 Comments