मोहोळ नगरपरिषद निवडणूक भाजप स्वबळावर लढवणार - नगरपरिषद भाजप गटनेते सुशील क्षीरसागर यांची माहिती

सर्वपक्षीय आघाड्यांना भाजप देणार आव्हान
मोहोळ (कटुसत्य. वृत्त.): येत्या काळात होणाऱ्या मोहोळ नगरपरिषदेची निवडणूक भारतीय जनता पक्ष स्वबळावर आणि कमळ पक्ष चिन्हावर मोठ्या ताकतीने शहर आणि तालुक्यातील सर्व आजी-माजी पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन लढवणार असून याबाबतची पूर्व नियोजन बैठक ग्रामपंचायत निवडणूक पार पडल्यानंतर आयोजित केली जाणार आहे. शहराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असणारी ही निवडणूक भारतीय जनता पक्षाचे जिल्ह्याचे मार्गदर्शक तथा माजी सहकार मंत्री सुभाष बापू देशमुख, माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख, भीमा परिवाराचे आधारवड तथा राज्यातील भाजप नेते तथा प्रदेश उपाध्यक्ष धनंजय महाडिक, त्याचबरोबर जिल्ह्याचे भाजप अध्यक्ष श्रीकांत देशमुख,भाजपचे नेते संतोष अण्णा पाटील, मोहोळ तालुक्याचे भाजप मार्गदर्शक विजयराज दादा डोंगरे,लोकसेवक संजय अण्णा क्षीरसागर, भाजप किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष शंकरराव वाघमारे, तालुका अध्यक्ष सुनील दादा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली लढवली जाणार आहे अशी माहिती मोहोळ नगरपरिषदेचे भाजप गटनेते तथा प्रभाग क्रमांक १६ चे नगरसेवक सुशील भैय्या क्षीरसागर यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
गत नगरपरिषद निवडणुकीच्या अनुभव भाजपच्या पाठीशी असल्याने शिवाय महाविकास आघाडी राज्यात असल्याने केवळ आणि केवळ सक्षम विरोधी पक्षाची भूमिका भारतीय जनता पार्टीत पार पाडत आहे. त्या अनुषंगाने या निवडणुकीला देखील समोर राष्ट्रवादी असो अथवा महाविकास आघाडी असो त्यांचा खरा सामना आमच्या भाजप पक्षाच्या उमेदवारांशी होणार आहे असाही दावा या वेळी सुशील भैय्या क्षीरसागर यांनी केला.
गत निवडणुकीत आमच्या पक्षाने दोन जागेवर विजय मिळवला होता या निवडणुकीत सर्वच्या सर्व जागा पुनश्च भारतीय जनता पक्ष लढवणार असून शहरातील मतदार बंधू भगिनींच्या विकासा बद्दलच्या अपेक्षा पूर्ण करण्यात विद्यमान सत्ताधाऱ्यांना पुरते अपयश आले आहे. सत्ता ही विकासासाठी असते सर्वांनी मिळून विकास निधी हा फक्त आपापल्या प्रभागात घेऊन जाण्यासाठी नव्हे. शहरातील बराच भाग विकासापासून कोसो दूर ठेऊन विकासाबाबतची दुजाभावाची वागणूक सत्ताधाऱ्यांनी भाजप बहुल प्रभागांना दिली आहे. शिवाय शहरातील जनतेने नेमका विकास कोणत्या भागाचा आणि कोणाकोणाचा झाला हे उघड्या डोळ्यांनी पाहिले आहे. त्यामुळे मतदार बंधू-भगिनींना या निवडणुकीत सक्षम आणि चांगला पर्याय म्हणून भाजप हाच पक्ष आश्वासक वाटत आहे. सध्या राज्यात भारतीय जनता पक्ष अत्यंत सक्षमपणे विरोधी पक्षाची भूमिका पार पाडत आहे शिवाय देशातही भाजप पक्षच सत्तेवर असल्यामुळे मोहोळ नगरपरिषद निवडणूक भारतीय जनता पक्ष पूर्ण ताकतीने आणि अत्यंत आत्मविश्वासाच्या वातावरणात लढणार आहे. यावेळी सतीश पाटील, मुजीप मुजावर, महेश सोवनी, सागर लेंगरे,नवनाथ चव्हाण,विशाल डोंगरे, अरविंद माने उपस्थित होते
0 Comments