Hot Posts

6/recent/ticker-posts

महुदचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब पवार यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

महुदचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब पवार यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

सांगोला (कटूसत्य. वृत्त.): महूद ता. सांगोला येथील ज्येष्ठ नेते बाळासाहेब दशरथ पवार यांनी शुक्रवार दि.18 रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्याचे उपाध्यक्ष मा आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत जाहीर प्रवेश केला. काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या ग्रामपंचायत निवडणुक पाहता महूद परिसरातील राजकीय क्षेत्रात हा प्रवेश महत्त्वपूर्ण मानला जातो.

गेल्या अनेक वर्षांपासून बाळासाहेब दशरथ पवार हे महूद व परिसरातील राजकारण व समाजकारणात सक्रिय आहेत. राजकीय व सामाजिक जीवनात त्यांना प्रचंड अनुभव आहे. शिवाय परिसरात त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे. आगामी ग्रामपंचायत निवडणुकीच्या दृष्टीने बाळासाहेब पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमधील पक्ष प्रवेश निश्चितच महत्त्वपूर्ण समजला जातो. शुक्रवार दि 18 रोजी मा.आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी बाळासाहेब पवार यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सत्कार करून स्वागत केले. यावेळी धनंजय पाटील, सुरेश नागणे, जनार्धन नागणे, सुखदेव चव्हाण, मधुकर आसबे, बाबुराव नागणे, दिलीप नागणे आदींसह महूद परिसरातील नेते कार्यकर्ते उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments