मोहोळ तालुक्यातील भोयरे येथे वाळू चोरीवर कारवाई ; नऊ वाहनासह ६२ लाखांचा मुद्देमाल जप्त

मोहोळ (कटूसत्य वृत्त):- सोलापूरचच्या शिस्तप्रिय पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी सीना काठ भागातील वाळूचोरीवर धडक कारवाई करण्याच्या सूचना विशेष कारवाई पथकास दिल्या. त्यानंतर कारवाई पथकाने टाकलेल्या धाडीत मोहोळ तालुक्यातील भोयरे येथे मोठी कारवाई करण्यात आली आहे त्यांनी नियुक्त केलेल्या पथकाने भोयरे येथे सीना नदीपात्रात मोठी कारवाई करत ६२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की सीना नदीच्या पात्रामधून मोहोळ तालुक्यातील भोयरे परिसरामध्ये बेकायदेशीररित्या वाळू उपसा करणाऱ्या टोळीवर जिल्हा पोलिस प्रशासनाच्या विशेष पथकाने धाड टाकीत नऊ वाहनां सह सुमारे ६१ लाख ८५ हजारांचा मुद्देमाल जप्त केल्याची घटना सोमवारी रात्री साडेबाराच्या दरम्यान घडली. याप्रकरणी पाच जणांसह अन्य दहा ते बारा व्यक्तींवर मोहोळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष बाब म्हणजे भोयरे पासलेवाडी अष्टे या भागात पोलीस अधिक्षक कारवाई पथकाने कारवाई केली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि. २८ रोजी रात्री साडेबारा वाजताच्या दरम्यान मोहोळ तालुक्यातील भोयरे हद्दीतील सीना नदीच्या पात्रात अवैध रित्या वाळू उपसा होत असल्याची माहिती सोलापूर च्या विशेष पथकाला मिळाली त्यानुसार पो. कॉ बहिर, दत्तात्रय झिरपे, मदने यांच्या विशेष पथकाने भोयरे हद्दीमध्ये अचानक धाड टाकली असता अवैधरित्या वाळूचा उपसा करणाऱ्या दहा ते पंधरा जण आढळून आले. यामध्ये टाटा कंपनीचे ६ टेम्पो, २ ट्रॅक्टर, १ हिरो होंडा कंपनीची मोटार सायकल, ४ मोबाईल तसेच वाळू उपसा करण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य व दहा ब्रास वाळूचा साठा असा सुमारे ६१ लाख ८५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून समाधान खंदारे, सागर पवार, तुकाराम खंदारे, सर्वजण रा. नरखेड, दीपक झेंडगे, भारत साठे, आदी ५ जणांसह अन्य १२ जणांच्या विरोधात शासनाची परवानगी नसताना बेकायदेशीर रित्या वाळू चोरी केल्याबद्दल भा.द.वि ३७९, ३४ पर्यावरण कायदा ९.१५ प्रमाणे पो. हे. कॉ लक्ष्मण हेमाडे यांनी फिर्याद दिली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक इंगळे हे करत आहेत.
0 Comments