मानवसेवेच्या संकल्पासह बार्शीतील रुग्णवाहिकेचे पूजन

बार्शी (कटूसत्य वृत्त):- दानशूर कुंकुलोळ परिवाराच्या सहकार्यातून प्रसन्नदाता गणेश मंदिर ट्रस्टच्या माध्यमातून बार्शीकरांच्या सेवेत मानवसेवेच्या संकल्पासह रुग्णवाहिका उपलब्ध करण्यात आली आहे. श्री दत्त जयंतीचे औचित्य साधून या रुग्णवाहिकेचे पूजन करण्यात आले. स्व.पुतळाबाई अगरचंदजी कुंकुलोळ यांचे स्मरणार्थ, सौ.पुष्पाबाई अशोकजी कुंकुलोळ यांचे वतीने मंगळवारी या रुग्णवाहिकेचे पूजन करून ट्रस्टकडे हस्तांतरीत करण्यात आले.
यावेळी अभय कुंकुलोळ, राहुल कुंकुलोळ, रोनक, योग व पलक कुंकुलोळ, ट्रस्टचे अध्यक्ष कमलेश मेहता, बंडू माने, बसवेश्वर गाढवे, प्रमोद भंडारी, अमोल यवनकर, नितीन शेटे, डॉ बेताळे, राजकुमार मंजुगडे, बापू झालटे, अरुण येळे, तम्मा विभूते आदी उपस्थित होते. कार्डियक सुविधेसह असलेल्या या रुग्णवाहिकेत ऑक्सिजन, डॉक्टर, नर्स आदी सोयी उपलब्ध करण्यात येणार असून, नाममात्र सेवा शुल्कात 24 तास सेवेसाठी सज्ज राहील अशी माहिती देण्यात आली आहे.
0 Comments