मोहोळ तालुक्यात रिपाइं अध्यक्ष केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले यांचा वाढदिवस विविध उपक्रमानी साजरा

मोहोळ (कटूसत्य. वृत्त.): रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A ) राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदासजी आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त मोहोळ येथे ग्रामीण रुग्णालय येथील रुग्णांना फळे व बिस्किट वाटप करण्यात आले.
रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया सोलापूर जिल्हा अध्यक्ष तथा पंचायत समितीचे उपसभापती अशोक नाना सरवदे मोहोळ ग्रामीण रुगणालयाचे अधीक्षक पी.पी. गायकवाड यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष गौतम क्षिरसागर पोपट गायकवाड, आनंद कुचेकर, अमोल कापुरे, सिताराम फडतरे, दीपक सरवदे,दादा काळे, हरी जगताप, विक्रम प्रक्षाळे, नामदेव पडळकर, हरि क्षिरसागर, अनिल महाळनोर इत्यादी सह अनेक जण उपस्थित होते.
0 Comments