मोहोळ येथे श्री बाल गणेश मंडळ यांच्या वतीने रक्तदान शिबीर संपन्न १२५ रक्तदात्यांनी केले रक्तदान

मोहोळ (कटूसत्य वृत्त):- कोरोना काळात राज्यातील रुग्णालयामध्ये रक्ताची टंचाई भासत आहे. त्यामुळे राज्यातील जनतेने स्वय स्फूर्तीने पुढे येऊन रक्तदान करावे. असे आव्हान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते. त्यांच्या शब्दाला सन्मान देऊन. मोहोळ येथील वीरशैव लिंगायत समाज कोणत्या मारुती चौक श्री बाल गणेश मंडळ अण्णाभाऊ साठे नगर व रवि डोकडे मित्रपरिवार श्री क्षेत्र मोहोळ विरभद्र यात्रे निमित्त रक्तदान शिबिर आयोजित केले होते. हे रक्तदान शिबिर मोहोळ येथील भुसार पेठ सीमोल्लंघन पांद रोड येथे आयोजित करण्यात आले होते यावेळी १२५ रक्तदात्यांनी रक्तदान केले प्रत्येक रक्तदात्यास आकर्षक भेटवस्तू व एक वर्षाचा विमा देण्यात आले. या उद्घाटन खर्गे महाराज यांच्या शुभहस्ते करण्यात. सह शहरातील नागरिक आणि रक्तदाते उपस्थीत होते.
या रक्तदान शिबिराला समस्त वीरशैव लिंगायत समाज व गवत्या मारूती चौक, श्री बाल गणेश मंडळ अण्णाभाऊ साठे नगर रवी रोकडे मित्रपरिवार या मंडळाचे कार्यकर्ते आणि परिसरातील नागरिकांनी परिश्रम घेतले.
0 Comments