Hot Posts

6/recent/ticker-posts

सांगोला नगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदी सोमेश यावलकर

सांगोला नगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदी सोमेश यावलकर

सांगोला (कटूसत्य वृत्त):- सांगोला नगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदी महायुतीचे रेवनील ब्लड बँकेचे चेअरमन व सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेले सोमेश यावलकर यांची काल मंगळवार दि.२९ डिसेंबर रोजी एकमताने निवड करण्यात आली.

सांगोला नगरपालिकेमध्ये सांगोला शहर विकास महायुती व सांगोला नगरविकास आघाडी असे दोन घटक एकत्रित पणे शहराचा कारभार करीत आहेत. महायुतीचे स्वीकृत नगरसेवकाचे पद रिक्त झाल्याने रेवनील ब्लड बँकेचे चेअरमन सोमेश यावलकर यांनी सोमवार दि.२८ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे स्वीकृत पदाचा उमेदवारी अर्ज दाखल केला होता. तेथेच त्या अर्जाची छाननी होऊन तो उमेदवारी अर्ज मंजूर करण्यात आला.

पीठासन अधिकारी नगराध्यक्षा राणीताई माने यांनी सांगोला नगरपालिकेत महायुतीचे स्वीकृत नगरसेवक म्हणून महायुतीचे सोमेश यावलकर यांची सांगोला नगरपालिकेच्या सभागृहात काल मंगळवार दि.२९ डिसेंबर रोजी निवड झाल्याचे जाहीर केले. यावेळी मुख्याधिकारी कैलास केंद्रे उपस्थित होते.

सभागृहामध्ये उपनगराध्यक्षा भामाबाई जाधव, महायुतीचे गटनेते आनंदा माने, गटनेते सचिन लोखंडे, नगरसेवक सुरेशआप्पा माळी, अस्मिर तांबोळी, प्रशांत धनवजीर, गजानन भाकरे, रफिक तांबोळी, नगरसेविका छायाताई मेटकरी, अप्सराताई ठोकळे, शोभाताई घोंगडे, माऊली तेली, डॉ.संतोष पिसे, उद्योगपती आनंदकाका घोंगडे, राजेंद्र पाटील गुरुजी यांच्यासह नगरपालिकेचे सर्व अधिकारी, कर्मचारी, यावलकर कुटुंबिय, मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपास्थित होते.

सोमेश यावलकर यांच्या स्वीकृत पदाच्या निवडीनंतर नगराध्यक्षासह नगरसेवकांचे सत्कार करण्यात आले. तसेच नूतन स्वीकृत नगरसेवक सोमेश यावलकर यांचा सर्व नगरसेवकांच्या वतीने सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी सोमेश यावलकर यांनी स्विकृत नगरसेवकपदी संधी दिल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.

माजी स्विकृत नगरसेवक सोमनाथ गुळमिरे म्हणाले, गेल्या वर्षभरात कोरोनामुळे मला काम करता आले नाही. यांची मनात खंत आहे. परंतु आमचे मित्र सोमेश यावलकर हे चांगले काम करतील असे त्यांनी सांगून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी गटनेते सचिन लोखंडे म्हणाले, सोमेश यावलकर यांना समाजकार्याची आवड असून त्यांनी त्यांच्या ब्लड बँक, पतसंस्थेमार्फत अनेक गरजूंना मदत केली आहे. त्यामुळे त्यांच्या काळात ते गोरगरीबांच्या समस्या नक्कीच सोडवतील, अशी अपेक्षा व्यक्त करुन शुभेच्छा दिल्या.

गजानन भाकरे म्हणाले, सोमेश यावलकर यांनी सांगोला शहराशी रक्ताचे नाते निर्माण केले आहे. सामाजिक कार्याची आवड असल्यामुळे सांगोला शहर महाविकास आघाडीने त्यांनी संधी दिली आहे. ते नक्कीच संधीचे सोने करुन मोठ्या प्रमाणात विकासकामे करतील असे सांगून शुभेच्छा दिल्या.

सुरेश माळी म्हणाले, काळ थोडा असून काम करण्यासाठी संधी मोठी आहे. सोमेश यावलकर यांना आरोग्य विषयक ज्ञान असल्यामुळे शहराच्या आरोग्य सेवेसाठी स्विकृत पदामार्फत ते चांगले काम करतील अशी अपेक्षा व्यक्त करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

जगन्नाथ भगत म्हणाले, गेली तीन वर्षे स्विकृत पदासाठी आयोध्या नगरी परिसरातील व्यक्तींना संधी दिली त्याबद्दल सर्वांचे आभार मानले. सोमेश यावलकर यांच्या आरोग्य सेवेचा उपयोग सांगोला शहराला होणार असल्याचे सांगून गरजूं व्यक्तींची कामे करुन सर्वांना दिलासा देण्यासाठी सोमेश यावलकर प्रयत्न करतील अशी अपेक्षा व्यक्त करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

निवडीनंतर सोमेश यावलकर मित्र परिवार, व्यापारी वर्ग यांनी सोमेश यालवकर यांची शहरातील प्रमुख मार्गावरून सवाद्य भव्य मिरवणूक काढली. या मिरवणुकीमध्ये नगरसेवक, मान्यवर, मित्र परिवार, व नागरिक सहभागी झाले होते. नगरसेवकपदी निवड झाल्यानंतर त्यांच्या चाहत्यांनी गुलालाची मुक्त उधळण करीत शहराच्या विविध मार्गावरुन मिरवणूक काढून शहरातील सर्व थोर महात्म्यास पुष्पहार अर्पण केला.

आरोग्य सेवेचा अनुभव असल्यामुळे शहराच्या आरोग्य सेवेसाठी चांगल्या पध्दतीचे काम करण्याचा आपला मानस आहे. गोरगरीब, गरजू नागरिकांच्या कामासाठी आपल्या नगरसेवक पदाचा  वापर करणार आहे. येणार्‍या वर्षभराच्या कालावधीत स्वीकृत नगरसेवक पदाला शोभेल असे सामाजिक काम करणार असून ज्या लोकांच्या आशिर्वादाने आज मी नगरसेवक पदापर्यंत पोहचलो आहे, त्यांना अभिमान वाटेल, असे काम करण्याचा माझा प्रयत्न असणार आहे.
Reactions

Post a Comment

0 Comments