जेऊर येथे संभाजी ब्रिगेड सह विविध राजकीय पक्षांच्या भारत बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

करमाळा (कटूसत्य. वृत्त.): संभाजी ब्रिगेडची स्थापनाच ही शेतकरी कष्टकरी व अठरा पगड जातींच्या अडचणी सोडवण्यासाठी झालेली आहे. शेतकऱ्यांचा मन-मनगट व मेंदू सक्षम करण्यासाठी आमची लढाई चालूच राहणार आहे शेतकरी विरोधी कायद्याला विरोध करण्यासाठी सर्वांनी या बंदला सहकार्य करा असे आवाहन संभाजी ब्रिगेड तालुका कार्याध्यक्ष बालाजी गावडे यांनी केले होते त्याला प्रतिसाद देत जेऊर व पंचक्रोशीत व्यापारी वर्गाने १००% प्रतिसाद देत जेऊर पूर्णपणे बंद पाळण्यात आला.
संभाजी ब्रिगेडने कायम शेतकरी व कष्टकरी यांच्यासाठी काम केले आहे व करत राहील या बंदमुळे देशातील शेतकरी एकाकी नसून सर्व समाजघटक त्याचसोबत आहेत हे नाकर्त्या भाजपा सरकारला दाखवून देण्याची हीच योग्य वेळ आहे. यावेळी महाराष्ट्र केसरी चंद्रहास निमगिरे, पै. माणिक दादा पाटील संभाजी ब्रिगेड पुणे विभागीय कार्याध्यक्ष नितीन खटके, सत्यम सूर्यवंशी, निलेश पाटील, आबासाहेब झाडे, नंदकुमार जाधव, पांडुरंग घाडगे, अतुल निर्मळ, राहुल घोरपडे सुयश कर्चे, राकेश पाटील, हेमंत शिंदे, पिंटू जाधव, धन्यकुमार गारुडी, अजिनाथ माने, शलमोन केसकर, सागर बनकर, सुभाष जगताप, शिवम कोठावळे, बाळासाहेब घाडगे, सागर लोंढे, बाबू शिंदे, बंडू मोहिते, सागर पंढरे, धनंजय निमगिरे, अमीन तांबोळी, अरुण निर्मळ आदी कार्यकर्ते उपस्थित होते त्यांनी जेऊर व पंचक्रोशीत फिरून बंद चे सुयोग्य नियोजन केले.
0 Comments