Hot Posts

6/recent/ticker-posts

दहिगाव व वांगी नंबर २ परिसरातील नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन

दहिगाव व वांगी नंबर २ परिसरातील नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन

करमाळा (कटूसत्य. वृत्त.): मंगळवार दिनांक 8 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी साडेपाच वाजता शेटफळ-दहीगाव रस्त्यावर पाणी दिलेल्या शेतात वनखात्याच्या अधिकाऱ्यांसोबत पाहणी करत असताना दोन तासापूर्वी म्हणजेच दुपारी तीन वाजल्यानंतर बिबट्या शेटफळ सोडून दहीगाव कडे गेल्याचे त्याच्या पावलांच्या ठशांवरून दिसून येत असून दहिगाव व वांगी नंबर 2 परिसरातील नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक श्रीकांत पाडूळे यांनी केले आहे.

याबाबत बोलताना ते म्हणाले की हा बिबट्या नरभक्षक असून त्याने अंजनडोह येथे दिनांक 5 नोव्हेंबर रोजी एका महिलेला ठार मारल्यानंतर काहीही खाल्लेले नसावे, त्यामुळे तो भुकेल्या पोटी कोणावरही हल्ला करू शकतो. विशेषतः दहीगाव, वांगी नंबर 2 शिवारामध्ये आज संध्याकाळी तसेच रात्री, उद्या सकाळी त्याचा रहिवास असणार आहे. कालच्या चिकलठाण येथील घटनेवरून हा बिबट्या केळीच्या शेतांमधून जास्तीत जास्त फिरण्याची शक्यता आहे. त्यामुळे दहीगाव, वांगी नंबर 2 परीसरातील सर्व नागरिकांनी तसेच शेजारच्या गावातील व शहरातील लोकांनी दक्षता घ्यावी कोणीही एकट्या दुकट्याने शेतामध्ये जाऊ नये. लहान मुलांना वयस्कर माणसांना घरात ठेवावे. मी या परिसरामध्ये फिरत असताना जनावरे राखताना किंवा शेतातील इतर कामे करताना आज बऱ्याच लोकांना एकटे पहिले आहे. त्यामुळे अशा लोकांना बिबट्यापासून धोका होऊ शकतो त्यामुळे सर्व नागरिकांनी सावधानता बाळगावी असे आवाहन पोलीस निरीक्षक श्रीकांत पाडूळे यांनी केले आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments