अखिल भारतीय किसान सभेचा दिल्ली शेतकरी आंदोलनाला पाठींबा

बार्शी कुर्डूवाडी रोडवरील बायपास चौकात केला 'रस्ता रोको'
बार्शी (क.वृ.):- केंद्र सरकार ने पारित केलेले शेतीमाल विक्री कायदा २०२०, शेती कायदा २०२०, वस्तू कायदा २०२० हे तीनही कायदे हे शेतकरी विरोधी आहेत ते रद्द करावेत ही मुख्य मागणी घेऊन दिल्ली शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने बार्शी कुर्डवाडी रोडवरील बायपास चौकात दिनांक 5 डिसेेंबर २०२० रोजी रस्ता रोको कॉम्रेड तानाजी ठोंबरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आला.
अधिक माहिती अशी की, गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेले दिल्लीत शेतकरी आंदोलकांवर केंद्र सरकार अमानुष अत्याचार करत आहे, याला विरोध करण्यासाठी त्यासोबतच शेतकरी विरोधी तीन कृषी कायदे रद्द करावेत, बार्शी मधील ऑक्टोबर 2020 मध्ये झालेल्या अतिवृष्टी नुकसान भरपाई तातडीने मिळावी, 2018 चा दुष्काळ निधी मिळावा, 2020 चा खरीप विमा मेळावा, दिवसाला लाईट पुरवठा व्हावा, स्वाभिमान किसान योजनेचा लाभ व्हावा, शेतीमालाला हमीभाव मिळावा, एफ आर पी डिक्लेअर होऊन शेतकऱ्यांना एफआरपीप्रमाणे मिळावी, या मागणीसाठी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. रस्ता रोको चे निवेदन तहसीलदार यांचे प्रतिनिधी मंडल अधिकारी उमेश डोईफोडे यांनी स्विकारले.
यावेळी कॉम्रेड तानाजी ठोंबरे,कॉ.लक्ष्मण घाडगे, कॉ. ए.बी. कुलकर्णी, तानाजी जगदाळे यांना अटक व सुटका करण्यात आली. आंदोलन यशस्वी करण्यासाठी बाळराजे पाटील, राम कदम, पोपट घाडगे, शिवाजी घाडगे, दत्तात्रय जगदाळे, लहू आगलावे, चारे येथील शेतकरी, आप्पा घाडगे संतोष माळी, रमेश माळी, कॉ. भारत भोसले, कॉ. धनाजी पवार, कॉ. प्रवीण मस्तूद, कॉ.अनिरुद्ध नकाते, जयवंत अांबिले, कॉ. शाफीन बागवान, कॉ. पवन आहिरे, भारत पवार, विकास पवार, बाळासाहेब मस्के, अर्जुन पोकळे, भगवान शिंदे, शिवाजी चव्हाण, मानसिंग निंबाळकर, शमशुद्दीन बागवान, वसीम बागवान, रहमान बागवान यांनी प्रयत्न केला.
0 Comments