Hot Posts

6/recent/ticker-posts

छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडच्यावतीने लसीकरण डोस व विद्यार्थ्यांचा सत्कार

छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडच्यावतीने लसीकरण डोस व  विद्यार्थ्यांचा सत्कार

 

सोलापूर (क.वृ.):- शहिद टेपु सुलतान जयंती निमित्त  सर्व प्रथम छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेड  तर्फे शहिद टेपु सुलतान यांच्या नामफलक बोर्डला हार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. यावेळी जेलरोड पोलीस स्टेशन चे पोलीस अधिक्षक लिगाडेसाहेब, माजी नगरसेवक पीर अहमद शेख, एन.सी.पी अल्पसंख्यांकचे जिल्हा अध्यक्ष फारूक मटके, शहर अध्यक्ष जुबेर बागवान, जिल्हा अध्यक्ष फारूक शेख, शहर अध्यक्ष मतीन बागवान, जिल्हा उपाध्यक्ष रिझवान शेख, शहर उपाध्यक्ष जावेद बद्दी व राजू हुंडेकरी यांची प्रमुख उपस्थिती होती.  

मान्यवरांचे हस्ते इंजिनियरींग मध्ये घवघवीत यश संपादन केलेले अयान अल्ताफ शेख यांनी सोलापूर गव्हर्नमेंट पॉलीटेकनिक डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनियर परीक्षेत सहाव्या सेमिस्टर मध्ये ९६. ३३ गुण मिळविले व तसेच सकलेन जाकीरहुसेन मुल्ला यांनी बी.ई.मेकॅनिकल इंजिनियरींग  तात्यासाहेब इन्स्टिटयूट ऑफ इंजिनियरींग अँड टेकनाॕलाॕजी वारणा नगर कोडोली जिल्हा कोल्हापूर या महाविद्यालयेत ९२.५ टक्के गुण प्राप्त केल्याने शॉल पुछपगुच्छ  देऊन त्यांच्या  मोठ्या थाटात सत्कार करण्यात आला. सोशल उर्दू प्रशालेत  छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेड व सोलापूर महानगर पालिका जिजामाता आरोग्य केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने लहान बाळांना बी.सी.सी लसीकरण व डोस चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात लस टोचणी व डोस घेतलेल्या  लहान बाळांना संघटने तर्फे उपदार पांगरून व गरोदर महिलांना प्रोटिन युक्त पावडर देण्यात आले .कार्यक्रमाच्या सुरुवातीला जिल्हा अध्यक्ष व शहर अध्यक्ष यांनी शहिद टेपु सुलतान यांचे  विचार मांडले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा व शहर चे सर्व पदाधिकारी यांनी  परिश्रम  घेतले .
Reactions

Post a Comment

0 Comments