अशोक कामटे संघटनेची सांगोल्यात शहीद स्मारक उभारण्यासाठी जागेची मागणी

सांगोला (क.वृ.):- सांगोला शहरात शहीद स्तंभ, स्मारक उभारण्याकरिता जागा मिळावी याकरिता सांगोला नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना शहीद अशोक कामटे सामाजिक संघटनेच्यावतीने निवेदन देण्यात आले. सांगोला शहर परिसरात शहिदांच्या स्मरणार्थ शहीद स्तंभ स्मारक, उभारणे करिता नगरपालिकेने आरक्षित केलेल्या जागेवर शहीद स्तंभ, स्मारक उभारणीकरिता जागा मिळावी .
जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील शहरात शहीद स्तंभ स्मारक असल्याने त्या शहराच्या सौंदर्यात भर पडलेली असून व ते शहीद स्मारक उभारणे हे प्रत्येक भारतीयांचे कर्तव्य असून त्यानिमित्त देशाभिमानाची भावना अधिकाधिक जागृती होईल, शहीद अशोक कामटे सामाजिक संघटना शहीद दिन व इतर देशभक्तीपर विविध कार्यक्रम गेल्या बारा वर्षापासून उपक्रम राबवित असून शहीद स्तंभ उभारणीकरिता जागा उपलब्ध करून दिल्यास अशोक कामटे संघटना त्याच्या उभारणीस सर्वतोपरी सहकार्य करेल .
संपूर्ण भारतवासीय आपल्या घरांमध्ये सुरक्षित आहेत याचे सर्वात मोठे श्रेय सीमेचे रक्षण करणाऱ्या भारतीय जवानांचे असल्याने जवान आपल्या जिवाची पर्वा न करता सीमेवरती रक्षण करत आहेत ,यामध्ये अनेक जवान शहीद होतात त्यांच्या स्मरणार्थ सांगोल्यात भव्य शहीद स्तंभ स्मारकास जागा नगरपालिकेने आरक्षित केलेल्या ठिकाणी मिळावी, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे .या निवेदनाच्या प्रती मा. उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, मिलिंद शंभरकर जिल्हाधिकारी सोलापूर ,खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आमदार शहाजीबापू पाटील, तहसीलदार अभिजीत पाटील यांनाही निवेदन दिल्याची माहिती शहीद अशोक कामटे सामाजिक संघटनेने दिली आहे.
0 Comments