Hot Posts

6/recent/ticker-posts

महाविकास आघाडीच्या वतीने सांगोल्यात विजयी उत्सव

 महाविकास आघाडीच्या वतीने सांगोल्यात विजयी उत्सव

महापुरुषांना पुष्पहार अर्पण करून फटाक्यांची आतिषबाजी

सांगोला (क.वृ.): पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे पदवीधर व शिक्षक दोन्ही उमेदवार निवडून आल्याबद्धल सांगोल्यात आनंदोउत्सव साजरा.शुक्रवारी सकाळी राष्ट्रवादी भवन येथे महाविकास आघाडीचे नेते व कार्यकर्ते यांनी एकत्रित येऊन "महाविकास आघाडी चा विजय असो" अशा घोषणा देत फटाक्यांची मुक्त आतिषबाजी केली.

यावेळी जेष्ठ नेते बाबुराव गायकवाड, प्रा. प्रबुद्धचंद्र झपके, माजी नगराध्यक्ष रफीकभाई नदाफ, तानाजीकाका पाटील, कमरुद्दीन खतीब, ज्ञानेश्वर कोळसे-पाटील आदी नेते उपस्थित होते.

विधान परिषदेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघातून निवडून आलेले पदवीधर आमदार अरुण गणपती लाड व शिक्षक आमदार प्रा.जयंत आसगावकर यांच्या विजयाचा आनंद साजरा करण्यात आला.यावेळी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य प्रा प्रबुद्धचंद्र झपके यांनी पुणे पदवीधर मतदार संघातील महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा विजय हा राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार एकसंघ असल्याचे सांगणारा आहे. भविष्यातील निवडणुकांच्या दृष्टीने मिळविलेले यश अत्यंत महत्वाचे आहे.या निवडणुकीच्या माध्यमातून शिक्षक व पदवीधरच्या सुज्ञ मतदारांनी महाविकास आघाडीला स्वीकारल्याचे दिसून येत आहे असे सांगून महाविकास आघाडीतील सर्वपक्षांच्या नेतेमंडळी व कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त करीत विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले.

यावेळी नगरसेवक सचिन लोखंडे,जुबेर मुजावर,अनिल खडतरे, राजकुमार पवार,अरुण बिले,आनंद घोंगडे,सुनील भोरे,दत्ता सावंत,नरेंद्र होणराव,सतीश काशीद,पवन स्वामी, प्रसाद खडतरे, गिरीश गायकवाड,अमोल सावंत, विशाल केदार, अक्षय स्वामी, मोहन कांबळे, संजय बाबर, नाथा जाधव,मनोज उकळे, रवी चौगुले, भारत दिघे, प्रवीण साळुंखे आदी कार्यकते उपस्थित होते. दरम्यान शहरातील सर्व महापुरुषांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करीत फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली,यावेळी उपस्थित कार्यकात्यानी" महाविकास आघाडीचा विजय असो"च्या घोषणांनी परिसर दणाणून टाकला होता.

Reactions

Post a Comment

0 Comments