Hot Posts

6/recent/ticker-posts

तरुणांचे संघटनात्मक कार्य कौतूकास्पद - उपनगराध्यक्ष प्रमोद डोके

तरुणांचे संघटनात्मक कार्य कौतूकास्पद - उपनगराध्यक्ष प्रमोद डोके 

मोहोळ (क.वृ.):- गेल्या दोन वर्षांपासून चाटी गल्ल्लीतील तरुण रोज दोन तास नियमितपणे परिश्रम करून गल्लीतील परिसरासह ऐतिहासिक वास्तू, मंदिर, गटारी, रस्ते, गल्लीतील नागरिकांच्या असणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी कायम पर्यत्नशील असतात. तरुणांनी केलेले कार्य सर्व युवकांसाठी प्रेरणादायी आहे.चाटी गल्ली येथे कायम पाण्याची टंचाई असते. कायम स्वरूपी पाण्याची सोया होईल अशी कोणत्याही प्रकारची सोय नाही. गल्लीतील नागरिकांनी वारंवार मागणी करून देखील कोणत्याही प्रकारची दाखल घेतली जात नाही हि गोष्ट लक्षात येताच गल्लीतील राहुल तावसकर व अमोल महामुनी यांनी गल्लीतील तरुणांना सोबत घेऊन तब्बल दोन वर्षापांसून आपल्या लोकांची सोय आपणच करायची असे ठरवून गल्लीतील घाणीने कचऱ्यांचे बुजून गेलेली विहीर श्रमदान करून स्वच्छ केली.असे एकजुटीने सार्वजनिक सामाजिक कार्य करण्याऱ्या तरुणांचे कार्य कौतुकास्पद असल्याची भावना मोहोळचे उपनगराध्यक्ष प्रमोद डोके यांनी व्यक्त केली. चाटी गल्लीतील पिसेची विहीर पाहण्यासाठी आल्यानंतर त्यांनी गल्लीतील तरुणांशी संवाद साधला या वेळी ते बोलत होते.

विहीर स्वच्छ केल्याने गल्लीतील नागरिकांची वापरायच्या पाण्याची कायमस्वरूपी सोय झाली आहे त्याचबरोबर विहारी शेजारी असलेले महाकालेश्वर मंदिराचे सुशोभीकरण ,बांधकाम करून परिसर अगदी प्रेक्षणीय बनवला आहे.आज मंदिराचा परिसरामध्ये पहाटे व्यायामासाठी तरुण असतात दिवसभर गल्लीतील वयोवृद्ध नागिरीक गप्पा मारत बसतात, लहान मुले खेळतात तसेच गल्लीतील महिलांना नागपंचमी, गवर, मकर संक्रांत इत्यादींसह सार्वजनिक उत्सव, साजरा करण्यासाठी प्रशस्त ठिकाण उपलब्ध झाले आहे.गल्लीतील लहान मोठे कार्यक्रम, लहान मुलांचे खेळाचा स्पर्धा, सद्याच्या इलेक्ट्रॉनिक जगामध्ये सगळेजण मोबाईलमध्ये व्यस्त असतात पण मोबाईल न वापरण्याच्या अटीवर  सायंकाळी गल्लीतील मुले व नागरिक मोबाईलचा वापर न करता गप्पा गोष्टी करतात व एका मेकांच्या विचाराची देवाण घेवाण करतात. मनाला शांती मिळावं असं मोहोळ शहरातील एक प्रेक्षणीय स्थळ तरुणांच्या प्रयत्नातून निर्माण झाले आहे. असे मत उपनगराध्यक्ष प्रमोद डोके यांनी व्यक्त केले.यावेळी राहुल तावसकर ,अमोल महामुनी, धनंजय गोटे, बालाजी सोनार, शिवरत्न स्वामी, विकास गोटे, जितेंद्र तूपसमिंदर आशिष गोटे, बुवा चौधरी कोळी मामा सह गल्लीतील नागिरक उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments