मोहोळच्या दक्षिण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी निवडणुकीत उतरणार ; राष्ट्रवादीचे युवा नेते लखन कोळी यांची माहिती

मोहोळ (क.वृ.):- गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक कार्याची आवड असल्यामुळे सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे. मात्र जर आपल्या परिसराचा विकास साध्य करायचा असेल तर त्यासाठी राजकीय क्षेत्राची आवश्यकता आहे त्यामुळे कार्यकर्ते आणि माझ्या परिसरातील जिवाभावाच्या व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली या पुढील काळात राजकीय क्षेत्रात पदार्पण करण्याचा मनोदय मोहोळ शहराच्या दक्षिण भागातील युवा नेते लखन कोळी यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले. येत्या काळात होणाऱ्या नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लखन कोळी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
गेल्या सात वर्षापासून प्रभागातील विविध नागरिकांच्या वैयक्तिक अडी-अडचणी सोडविण्यासाठी मी राष्ट्रवादीच्या माध्यमातून सुरुवातीपासून प्रयत्नशील आहे. प्रभागातील रस्ते, आरोग्य, पाणी या मूलभूत सोयीसुविधा सोडवण्यासाठी वेळोवेळी मोहोळ नगर परिषदेकडे सातत्याने मी पाठपुरावा करत आलो आहे. यापुढील काळातही कोणत्याही पदावर असो अथवा नसो राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून समाजाची सेवा करण्याचा आपला सातत्याने प्रयत्न राहील.
0 Comments