१५ दिवसांत मुस्लिम बांधवांच्या दफनभूमीचे काम न केल्यास स्वखर्चातून संभाजी ब्रिगेड काम करणार - नितीन खटके

करमाळा (क.वृ.):- अतिवृष्टीमुळे पडलेली मुस्लिम स्मशांभूमीची संरक्षक भिंत 15 दिवसांच्या आत न बांधल्यास संभाजी ब्रिगेड स्वखर्चाने बांधेल असा इशारा मसेस संभाजी ब्रिगेड विभागीय अध्यक्ष नितीन खटके यांनी एका पत्रकाद्वारे दिला आहे.
या पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, सर्वदूर झालेल्या अतिवृष्टी वेळी जेऊरच्या ओढ्याला आलेल्या पाण्यामुळे ओढ्यालागत असलेल्या मुस्लीम दफनभूमी ची संरक्षक भिंत पडली .याची जेऊर च्या स्थानिक प्रशासनाने कोणतीही दखल न घेता त्या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष केले आहे. आमचे सहकारी बालाजी गावडे यांनी या विषयी मुख्यमंत्री, पालकमंत्री, पंचायत समिती व जिल्हा परिषद यांना निवेदन देऊन वारंवार मागणी करूनही या बाबतीत काहीच हालचाल शासकीय पातळीवर झाली नाही. तालुक्यातील सर्वात जास्त उत्पन्न असणाऱ्या जेऊर ग्रामपंचायतने गावात एकही मास्क किंवा एकही सॅनिटाईजर ची बाटली न वाटता कोविड च्या नावावर सात लाख रुपयांचे बिल काढले. मग हा सामाजिक विषय अतिशय संवेदनशील असूनदेखील यामध्ये भ्रष्टाचार करायला मिळणार नाही म्हणून या विषयाकडे डोळेझाक होत असल्याचा आरोप त्यांनी या पत्रकाद्वारे केला आहे.येत्या पंधरा दिवसांत जेऊर मुस्लिम बांधवांच्या दफनभूमी च्या संरक्षक भिंती चे काम न झाल्यास जेऊर संभाजी ब्रिगेड व आमचे सहकारी महाराष्ट्र केसरी चंद्रहास निमगिरे , युवा नेते माणिक दादा पाटील, बाळासाहेब करचे, देवानंद जाधव पाटिल, बालाजी गावडे , व संभाजी ब्रिगेड चे इतर सहकारी मिळून हे काम स्वखर्चाने पार पाडणार असल्याचा इशारा खटके यांनी दिला आहे. हे काम कोणत्याही प्रसिद्धीसाठी तसेच श्रेयवादासाठी न करता मुस्लिम समाजाच्या असुविधेपोटी करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
जेऊर मुस्लिम दफनभूमी ही ओढ्यालगत असून या ठिकाणी मुस्लिम समजला निषिद्ध अशा जनावरांचा वावर असतो. दुर्दैवाने किंवा अपघाताने जर काही अनुचित घटना घडली तर त्यास ग्रामसेवक जेऊर, गटविकास अधिकारी पंचायत समिती करमाळा व बांधकाम विभाग पंचायत समिती करमाळा हे सर्वस्वी जबाबदार असतील असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
यावेळी आबासाहेब झाडे, नंदकुमार जाधव, पांडुरंग घाडगे, हेमा शिंदे ,पिंटू जाधव, धन्यकुमार गारुडी, समीर केसकर, राहुल घोरपडे, निलेश पाटिल , बाळासाहेब घाडगे, अत्तुल निर्मळ, राकेश पाटील, बापू आवारे ,सत्यम सुर्यवंशी ,अजिनाथ माने, सागर लोंढे, सुहास शिंदे, सागर पंढरे ,शिवम कोठावळे ,बंडू मोहिते ,सुभाष जगताप, अरुण निर्मळ , सागर बनकर आदी उपस्थित होते.
0 Comments