Hot Posts

6/recent/ticker-posts

शेतकऱ्यांना पंपासाठी दिवसा वीज देण्याची स्वाभिमानीची मागणी

शेतकऱ्यांना पंपासाठी दिवसा वीज देण्याची स्वाभिमानीची मागणी

करमाळा (क.वृ.): सध्या करमाळा तालुक्यात बिबट्याचा वावर वाढल्यामुळे शेतकरी भयभीत झाले असल्याने शेतकऱ्यांना पंपासाठी दिवसा पूर्ण दाबाने वीज पुरवठा करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने वीज वितरण कंपनी कडे केली आहे.करमाळा उपविभागीय अभियंता यांच्याकडे एका निवेदनाद्वारे ही मागणी करण्यात आली आहे.

या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, करमाळा तालुक्यात बिबट्याने दहशत निर्माण केली असून शेतकरी वर्गाला पिकाला पाणी देण्यासाठी रात्री अपरात्री शेतात जावे लागते. बिबट्याच्या दहशतीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करण्यात यावा. तसेच काही कारणामुळे वीजपुरवठा खंडित करावा लागल्यास त्वरित दुरुस्ती करून वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

यावेळी तालुकाध्यक्ष सुदर्शन शेळके, युवा अध्यक्ष अमोल घुमरे, दीपक शिंदे, तालुका उपाध्यक्ष तानाजी शिंदे, कांतीलाल शिंदे, तुषार शिंदे आदी उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments