Hot Posts

6/recent/ticker-posts

शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडविणाऱ्या एस.एम.आवताडे कंपनीवर कारवाई करा - सोनंद येथील शेतकऱ्यांची मागणी

शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडविणाऱ्या एस.एम.आवताडे कंपनीवर कारवाई करा - सोनंद येथील शेतकऱ्यांची मागणी

सांगोला तहसील कार्यालयाच्या समोर धरले आमरण उपोषण

सांगोला (कटूसत्य. वृत्त.): सोनंद ता. सांगोला येथील शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडविणाऱ्या श्री एस. एम.आवताडे प्रायव्हेट लिमीटेड मंगळवेढा या कंपनीवर कारवाई करून शेतकऱ्यास न्याय मिळावा, यासाठी आज 14 डिसेंबर पासून सांगोला तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. सदर आमरण उपोषणास सोनंद येथील शेतकरी प्रकाश तुकाराम सोळगे, सुरेश तुकाराम सोळगे,यांचा समावेश आहे. याबाबत शेतकऱ्यांनी दिलेली माहिती अशी की, अंकुश दगडू चव्हाण यांचा जमीन गट नंबर 1076 मधील आवताडे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी मंगळवेढा या कंपनीने करारात फेरबदल करून संबंधित शेतकऱ्यांची फसवणूक केली असल्याची तक्रार उपोषण कर्त्या शेतकऱ्यांनी केली आहे.

सदर आमरण उपोषण हे एस.एम.आवताडे कंपनीवर फौजदारी गुन्हा दाखल करावा, शासनाने दिलेल्या परवानगीपेक्षा जास्त अवैधपणे उत्खनन करून करोडो रुपयांचा शासनाचा महसूल संबंधित कंपनीकडून वसूल करावा, उत्खनन केलेल्या जागेचा त्वरित पंचनामा करून ईसीएस मशीनद्वारे मोजमाप करावे, शेतकऱ्यास मारहाण करून जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या दादासाहेब ऊर्फ बाळासाहेब आवताडे व त्यांच्या साथीदारांवर गुन्हा नोंद करून कायदेशीर कारवाई करावी,व  कर्तव्यात कसूर करणाऱ्या व संबंधित कंपनीला पाठीशी घालून शासनाचा करोडो रुपयांचा महसूल बुडविण्यास सहकार्य करणाऱ्या संबंधित महसूल कर्मचारी यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी व शेतकर्‍यांना योग्य न्याय द्यावा, या विविध मागण्यांसाठी प्रकाश तुकाराम सोळगे, सुरेश तुकाराम सोळगे, अंकुश दगडू चव्हाण यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे.
Reactions

Post a Comment

0 Comments