Hot Posts

6/recent/ticker-posts

अकलुज येथे कवी संमेलन संपन्न

अकलुज येथे कवी संमेलन संपन्न

अकलूज (कटूसत्य. वृत्त.): ६ डिसेंबर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अकलूज येथे युवासेना व योद्धा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने प्रबोधनात्मक काव्य संमेलन महाराष्ट्रातील नामवंत कवींच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.

कार्यक्रमाचे उद्घाटन इतिहासतज्ञ शिवश्री. श्रीमंत कोकाटे व अमित प्रभा वसंत (समाजसेवक कोल्हापूर) यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर दंगलकार  नितीन चंदनशिवे,सागर काकडे, सुमित गुणवंत,रोहित देशमुख यांच्या विद्रोही शब्दांनी वातावरणात अंगार भरला क्रांतीची मशाल होणाऱ्या बुद्ध महावीरांना आणि शोषितांचा वारकऱ्यांचा सखा विठ्ठल बुद्ध कसा वाटतो इथवर कविता बहरत गेली.

कविसंमेलनात इतिहाससंशोधक श्रीमंत कोकाटे यांनी उपस्थितांना वास्तविक ऐतिहासिक दाखले देत उपस्थितांचे प्रबोधन केलं दिल्लीतील शेतकरी आंदोलन आणि गरीब,शोषित समाज देशोधडीला लावण्यासाठी सत्ताधारी आणि भांडवलदार कसे हातात हात घालून आहेत याचे विवेचन त्यांनी केले. याप्रसंगी कोल्हापूर येथील मनोरुग्णांसाठी काम करणारे समाजसेवक अमित प्रभा वसंत यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यावेळी माळसिरस तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यातील,महाराष्ट्रातील नामवंत व नवोदित कविंनी कविता सादर केल्या.आभार शेखर खिलारे यांनी मानले.कार्यक्रमासाठी दलित महासंघ प.म अध्यक्ष राजाभाऊ खिलारे बहुजन नेते विकास धाईंजे,युवासेनेचे ता.प्रमुख.गणेश इंगळे,किरण भांगे, सुहास उरवने ,सौरभ वाघमारे,अक्षय जाधव,दत्ता भाऊ साळुंके,संदीप इंगवले,अवि सोनवणे,गोल्डमन संदीप गांधी, बोरावके,बच्चन साठे,शिवराम गायकवाड,अजिंक्य पासगे,अरुण पंचाळ,सागर साळुंखे यांनी परिश्रम घेतले.उपस्थितांची गदी लक्षवेधी होती.

Reactions

Post a Comment

0 Comments