टेंभुर्णी येथील प्रतिष्ठित जेष्ठ नेते ॲड. कृष्णात बोबडे यांचे निधन

टेंभुर्णी (कटूसत्य. वृत्त.):- टेंभुर्णी येथील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व ॲड. कृष्णात आनंदराव बोबडे जनसामान्यांचे सहकारी,शांत, संयमी , प्रेमळ व अजातशत्रू व्यक्तिमत्व रविवारी( दिनांक १३) सायंकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या अकाली निधनाने टेंभुर्णी परिसरात शोकाकुल वातावरणात निर्माण झाले. ते ७१ वर्षाचे होते .त्यांचे पश्चात पत्नी, २बंधू, ७बहीणी,३मुले, १मुलगी, सूना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. कृष्णात बोबडे हे 'दादा' या नावाने सर्वपरिचित व्यक्ती होते.ते मोहिते पाटील गटाचे खंदे समर्थक होते. त्यांच्या निधनाने टेंभुर्णी पंचक्रोशीत कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या जाण्याने शांत संयमी व प्रामाणिक राजकीय कारकीर्दीचा अस्त झाला आहे.
सध्या सुरू असलेल्या संधीसाधू व सोईच्या राजकीय भूमिकेमुळे बदनाम झालेल्या राजकारणत स्वच्छ व प्रामाणिक चारित्र्य संपन्न राजकारण कसे करावे याचे मुर्तिमंत उदाहरण म्हणजे अँड.कृष्णात बोबडे. राजकीय शिष्टाचार जोपासणारे सध्याच्या काळात एकमेव अद्वितीय राजकारणी म्हणून त्यांना ओळखले जात होते. कधीही स्वताःचे व पक्षाचे कितीही नुकसान झाले तरी प्रामाणिकपणा न सोडणारे माढा तालुक्यातील राजकीय पुढारी म्हणून त्यांची ओळख होती. माढा तालुक्यातील राजकारणात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. ते मोहिते पाटील गटाचे खंदे समर्थक, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे व माजी आमदार धनाजी साठे यांचे स्नेही होते. त्यांचा माढा तालुक्यातील कोंढार भाग व टेंभुर्णी परिसरात मोठा चाहता वर्ग आहे. ते खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष, विजय शुगरचे संचालक, बोबडे गटाचे प्रमुख, माऊली शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक, टेंभुर्णी ग्रामपंचायतीचे सरपंच अशी विविध पदे त्यांनी भुषवली होती. त्यांचे राजकीय ,सामाजिक, व वैयक्तिक पातळीवर सर्व थरातील नागरिकांशी अतिशय सलोख्याचे संबंध होते. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ आणि दुःख व्यक्त होत आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच टेंभुर्णी येथील बाजारपेठ आणि दुकाने कडकडीत बंद ठेवून त्यांना आदरांजली व्यक्त करण्यात आली.
भाजपाचे माढा तालुकाध्यक्ष योगेश बोबडे, लक्ष्मी आनंद टायर रिमोल्डिंगचे मालक नागेश बोबडे व मुंबई उच्च न्यायालयातील विधिज्ञ रुपेश बोबडे यांचे ते वडील होते. माढा विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना नेते संजय कोकाटे यांचे मामा व सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष व लक्ष्मी आनंद प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष ऋषिकेश बोबडे यांचे चुलते होते. त्यांच्या अकाली निधनाने टेंभुर्णी परिसरात कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.
आज दि.14/12/20 रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास टेंभुर्णी-नगोर्ली रस्त्यावर असणारे सनराइज् इंग्लिश मीडियम स्कूल च्या प्रांगणात टेंभुर्णी परिसरातील व पंचक्रोशीतील सर्व नागरिकांच्या उपस्थित टेंभुर्णी चे नेते कृष्णात बोबडे यांना शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
0 Comments