बिबट्याच्या खातम्यासाठी हेलिपॅडच्या परवानगीसाठी गणेश चिवटे यांचे तहसीलदारांना निवेदन

करमाळा (कटूसत्य. वृत्त.): नरभक्षक बिबट्यास जेरबंद करण्यासाठी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केली हेलिकॉप्टरची व्यवस्था केली असून त्यासाठी हेलिपॅडची परवानगी देण्याची मागणी भाजपचे तालुकाध्यक्ष गणेश चिवटे यांनी तहसीलदारांकडे केली आहे. सोमवारी गणेश चिवटे यांनी या आशयाचे निवेदन तहसीलदार समीर माने यांना दिले.
याबाबत अधिक माहिती देताना गणेश चिवटे म्हणाले की, गेली पंधरा दिवस झाले करमाळा तालुक्यात नरभक्षक बिबट्याने दहशत माजवली आहे. सध्या तो बिबट्या वांगी,सांगवी, ढोकरी, चिखलठाण, शेटफळ या भागातील ऊस व केळीच्या शेतामध्ये असल्याने वन खात्यातील आधिकरी व शार्पशुटर यांना बिबट्यास जेरबंद तथा निशाणा साधण्यास कठीण जात आहे .ही परस्थिती पाहता माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी हेलिकॉप्टरची तातडीने व्यवस्था केली आहे. प्रशासनाने तातडीने हेलिपॅडची परवानगी द्यावी आणि नागरिकांच्या डोक्यावर असलेली बिबट्याची टांगती तलवार दूर करावी अशी मागणी भाजपचे तालुकाध्यक्ष गणेश चिवटे यांनी केली.
यावेळी तालुका सरचिटणीस सुहास घोलप, तालुका उपाध्यक्ष रामभाऊ ढाणे , किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष विजयकुमार नागवडे , मनोज मुसळे आदि उपस्थित होते.
0 Comments