Hot Posts

6/recent/ticker-posts

तुम्ही सर्वांनी संधी दिल्यास प्रभाग १४ शहरातील सर्वाधिक विकसित प्रभाग बनवेन सामाजिक कार्यकर्ते लखनभाऊ कोळी यांची भावनिक साद

तुम्ही सर्वांनी संधी दिल्यास प्रभाग १४ शहरातील सर्वाधिक विकसित प्रभाग बनवेन सामाजिक कार्यकर्ते लखनभाऊ कोळी यांची भावनिक साद

प्रभाग १४ मध्ये विचारविनिमय बैठक संपन्न

मोहोळ (साहील शेख)(कटूसत्य. वृत्त.): आपला सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेला प्रभाग क्रमांक १४  गेल्या पाच वर्षापासून अनेक कामे प्रलंबित राहिल्याने विकासापासून कोसो दूर राहिला आहे.वारंवार प्रशासनाकडून दुर्लक्षितपणाची मिळालेली वागणूक आणि विकासात्मक बाबीमध्ये झालेली गळचेपी आता यापुढे सहन होईना म्हणून येत्या काळात होणाऱ्या नगर परिषद निवडणुक उतरण्याचा माझा मनोदय निश्चीत आहे. मात्र त्यासाठी प्रभागातील ज्येष्ठ मार्गदर्शक आणि बंधू भगीनींची संमती घेणे गरजेचे आहे. कारण प्रभागातील सर्वसामान्य जनतेने सर्व स्तरांतील नागरिकांनी मोठ्या विश्वासाने मला सामाजिक क्षेत्रात कार्यरत असताना आजवर जे सहकार्य केले ते कधीही विसरणे शक्य नाही. आजवर मी जे काय आहे ते तुम्हाला सर्व जिवाभावाच्या जनतेमुळेच आणि या पुढील काळातही असेन ते देखील तुम्हा सर्व बंधुभगीनी मुळेच असेन असे भावनिक प्रतिपादन प्रभाग क्रमांक १४ मधील नगरसेवक पदाचे प्रबळ दावेदार लखनभाऊ कोळी यांनी केले.

येत्या काळात होणाऱ्या मोहोळ नगर परिषदेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक १४ मधून निवडणूक लढवण्याचा निर्धार लखनभाऊ कोळी समर्थकांनी केला आहे. मात्र यासाठी प्रभागातील सर्वसामान्य जनता आणि बंधू-भगिनींशी संवाद साधावा त्यांच्याशी विचारविनिमय करावा यासाठी आयोजित बैठकीमध्ये लखनभाऊ कोळी बोलत होते.

यावेळी सचिन भैय्या फाटे,सागरदादा कोळी, नरेंद्र कसबेकर सर, दीपक कांबळे, पंकज कांबळे, बबलूभाऊ कोळी, लक्ष्मण घाडगे इत्यादी मान्यवर व्यासपीठावर होते.

यावेळी लखनभाऊ कोळी यांनी प्रभागातील सर्व जेष्ठ मान्यवरांशी संवाद साधत त्यांची उमेदवारी बद्दलचे मत अजमावून घेतले. ही विचारविनिमय बैठक यशस्वी करण्यासाठी भैय्या गायकवाड,पप्पू कोळी,गुरुनाथ चव्हाण, नागेश चव्हाण, जावेद शेख, आकाश हनुमंते, नवाब कोळी, गोटू बरकडे, संतोष कोळी, विष्णू गोडसे, लक्ष्मण घाडगे, विकी पवार, प्रदीप घोडके, बंडू भानवसे, सुदामा शिंगाडे, बापू सरवदे,विनोद कोळी, मंगेश सावंतराव, सुरज माने, नरेश सावंतराव, नागनाथ सरवदे, महेश मोरे,विकी कोळी, सोमा कोळी, प्रेम सरवदे,  अप्पा सरक -पाटील, नागेश गोडसे,नवनाथ कोळी, मोरया चंदीले, आकाश माने, खंडू लवटे, मोईन शेख, विष्णु गोडसे,  रवी महामुनी, नागेश भांगे, आशिष खरात, दिलीप लांबोरे ,दिलीप खंदारे, बालाजी माने, राजू चव्हाण, योगेश फाळके, माऊली कोळी, नवनाथ घोडके, महेश गोरवे, रमेश शिंदे, दिलीप मडीखंबे, सूरज चव्हाण, नागनाथ घोडके, निखील मोरे, मनोज कोळी, शुभम कोळी, चंद्रकांत भांगे, राजु भांगे ,आदित्य चव्हाण आशिष केवळे सागर मेटकरी, इरफान मिर्झा, अफसर मुजावर,दादाभाई मुलांणी, बाळु कोळेकर, आनंद महाडीक, दयानंद स्वामीयांनी परिश्रम घेतले. यावेळी सूत्रसंचालन नरेंद्र कसबेकर सर यांनी केले तर आभार स्वतः लखनभाऊ कोळी यांनी व्यक्त केले.

यावेळी लखनभाऊ कोळी यांनी सर्व कार्यकत्यांशी अगदी आपुलकीने संवाद साधत या निवडणुकीसाठी काय राणनीती आखता येईल याबद्दलही चर्चा केली. यावेळी प्रभागातील बहुतांश बंधू-भगिनी आपण निवडणूक लढवावी. आम्ही सर्वजण आपल्या सोबत आहोत अशी ग्वाही लखनभाऊ कोळी यांना देताच सर्वांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांच्या निर्णयाला पाठींबा देत स्वागत केले. लखनभाऊ कोळी यांच्या उमेदवारीमुळे प्रभाग क्रमांक १४ मधील निवडणूक अत्यंत चुरशीची आणि रोमहर्षक होणार आहे यात शंकाच नाही. गत निवडणुकीच्यावेळी अपेक्षित पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्याने लखनभाऊ कोळी यांनी माघार घेत तत्कालीन राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मन मोठे करत विजयी केले होते. पण आता या वेळी स्वतः लखन कोळीच मैदानात उतरल्यामुळे ही निवडणूक लक्षवेधी ठरणार आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments