Hot Posts

6/recent/ticker-posts

गणेश चिवटे यांच्यातर्फे गायगोठा व्यवस्थापन व मार्गदर्शन शिबिर संपन्न

गणेश चिवटे यांच्यातर्फे गायगोठा व्यवस्थापन व मार्गदर्शन शिबिर संपन्न

करमाळा (कटूसत्य. वृत्त.): गणेश नागनाथ चिवटे मिल्क कलेक्शन सेंटर व नेचर डीलाईट डेअरी यांच्या संयुक्त विद्यमाने गायगोठा व्यवस्थापन व मार्गदर्शन शिबीर संपन्न झाले.

हे शिबीर केमिस्ट भवन ,करमाळा येथे दि.14/12/2020 रोजी सकाळी 11:00 ते 2:00 या वेळेत संपन्न झाले. या कार्यक्रमास मार्गदर्शक म्हणून डॉ. सचिन पाटील, डॉ. मनोज काळे, सेल्स मॅनेजर नेचर फिड्स रोहित शितोळे हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जी. एन. सी. डेअरीचे संस्थापक अध्यक्ष  गणेश चिवटे यांनी केले. यावेळी बोलताना गणेश चिवटे म्हणाले की, सध्या दूध व्यवसायात तरुण पिढी उतरली असून त्यांचा दूध व्यवसायातील उत्साह कायम टिकून ठेवण्यासाठी व दूध वाढीसाठी या मार्गदर्शन शिबिराचे आयोजन आपण केले आहे.

डॉ.सचिन पाटील यांनी मार्गदर्शन करत असताना शिबिरास आलेल्या दूध उत्पादकांनी त्यांना या व्यवसायात तसेच गायींच्या संबंधित येणाऱ्या समस्या संदर्भात विचार विनिमय केला. आगामी काळात दूध उत्पादकांना येणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी आपण शेतकऱ्यांच्या सोबत असल्याचा विश्वास यावेळी डॉक्टरांनी दिला.

विजयकुमार नागवडे यांनी उपस्थित दूध उत्पादकांचे आभार मानले.यावेळी शिबिरासाठी  करमाळा तालुक्यातील सर्व दूध उत्पादक बहुसंख्येने उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments