सांगोला शहर आणि तालुक्यातील रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या अनधिकृत लॅबरोटरी लवकर बंद करा,अन्यथा तीव्र आंदोलन छेडू-कालिदास कसबे
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सांगोला शहर आणि तालुक्यात भाजीपाल्याचे दुकान सुरू करावे, याप्रमाणे दररोज लॅबरोटरी लॅब सुरू आहेत. या अनाधिकृत पॅथॉलॉजी चालकांकडूनआणि तंत्रज्ञाकडून रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. जेथे रुग्णालय तेथे मेडिकल स्टोअर्स आपण पाहतो , मात्र आता जिथे रुग्णालय तिथे लॅबरोटरी सुरू करण्याचा प्रकार सांगोला शहर आणि तालुक्यात सुरू आहे.या अनधिकृत लॅबरोटरी चालकांकडून वैद्यकीय क्षेत्रातील नियमांचा भंग होत आहे,अनेक रोगांशी सामना करणाऱ्या रुग्णांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार होताना दिसून येत आहे. येणाऱ्या काळात सांगोला शहर आणि तालुक्यातील या अनाधिकृत लॅबरोटरी वर कारवाई करून बंद केल्या नाहीत तर सांगोला तहसील कार्यालयासमोर तीव्र लढा उभारू,असा इशारा सामाजिक कार्यकर्ते कालिदास कसबे यांनी दिला आहे.
मागील आठवड्यात दैनिक सोलापूर कटुसत्य ने याबाबतीत या लॅबरोटरीचा वस्तुनिष्ठ बातमीच्या माध्यमातून भोंगळ कारभार चव्हाट्यावर आणला होता,तेव्हा एकच खळबळ माजली होती.अनेकांनी सांगोला तालुक्यात काम पाहणाऱ्या वृत्तदर्पण न्यूज चॅनेल आणि दैनिक कटुसत्य च्या प्रतिनिधींना फोन करून "प्रकरण ताणू नका"अशी विनंती केली होती. सांगोला शहर आणि तालुक्यातील "कमजोर ते कमजोर वर शिरजोर"अशा अविर्भावात राहणारे बोगस लॅबधारक आपल्यापैकीच कुणीतरी पत्रकारांस आर्थिक मलिदा पुरवून संबंधित बातमी छापण्यास सांगितले असल्याचा महातर्क या लॅबधारकांनी काढला.एवढेच नाहीतर जनतेची दिवसाढवळ्या लूट करणाऱ्या वाढेगाव नाका येथील अनाधिकृत लॅबधारकातील एका महाशयांनी तर संबंधित प्रतिनिधींचा नावासह संपूर्ण पत्ता देवून फोन करून विचारणा करण्यास सांगितले.
न्यायालयाच्या आदेशानुसार टेक्निशियन यासाठी केवळ डॉक्टर एमडी पॅथॉलॉजिस्ट हेच योग्य अधिकारी आहेत, असे असताना अनेक डॉक्टरांकडून रुग्णालयातच दहा बाय दहा च्या खोली मध्ये पॅथॉलॉजी लॅब सुरू करून प्रशिक्षण देवून रुग्णांच्या रक्ताचे नमुने घेण्यास सांगतात. असे गंभीर प्रकार सांगोला शहर आणि तालुक्यातील अनेक लॅबरोटरी मध्ये घडत असून लॅबचालक,तंत्रज्ञ व डॉक्टर यांच्या संगनमताने सुरू असलेल्या या प्रकारात रुग्णाना मात्र या बिलाचा शॉक बसत आहेत. एका पेशंट पाठीमागे 40 ते 50 टक्के कमिशन या डॉक्टरांना दिले जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
संबंधित डॉक्टर रुग्णांना गरज नसलेल्या सुद्धा चाचण्या लिहून देत असून अमुक-अमुक लॅबमध्ये जाऊन योग्य तपासणी करून घ्यावी व रिपोर्ट आणून दाखवा, असा सल्ला देत असल्याचे अनुभव अनेक रुग्णांना आले आहेत,त्यामुळे सांगोला शहरातील संबंधित विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ या अनाधिकृत लॅबवर कारवाई करावी, अन्यथा आंदोलनाच्या माध्यमातून त्यांना या लॅबरोटरी बंद करण्यास प्रशासनास भाग पाडू असा इशारा ही कालिदास कसबे यांनी दिला आहे.
सांगोला शहर आणि तालुक्यातील हे अनाधिकृत बोगस लॅबधारक रुग्णांच्या विविध तपासणीच्या माध्यमातून सर्व सामान्यांच्या खिशावर दिवसाढवळ्या दरोडा टाकत आहेत. दररोज लाखोंची उलाढाल होत आहे यात सहभागी असलेले मोहरे आता समोर आणण्याची गरज असल्याचे मत विविध स्तरातून उमटू लागले आहे
0 Comments