दहावीच्या विद्यार्थ्यांना मोफत स्टडी ॲप
रोटरी क्लब, टेंभुर्णी व रोटरी क्लब पिंपरी टाऊन यांचा संयुक्त उपक्रम

टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):- रोटरी क्लब टेंभुर्णी यांचे मार्फत दहावी च्या विद्यार्थ्यांना मोफत स्टडी ॲप उपलब्ध करून देण्यात आले. टेंभुर्णी मधील जवळपास 600 दहावी तील विद्यार्थ्यांना हे स्टडी ॲप उपलब्ध करून देण्यात आले. करोना मुळे चालू शैक्षणिक वर्षांत बराचसा विस्कळित पणा आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी मदत व्हावी असा रोटरी चा उद्देश आहे. तसेच हे स्टडी ॲप हे विनामूल्य उपलब्ध करून रोटरी ने आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे. सदर स्टडी ॲप हे रोटरी डिस्ट्रीक्ट 3131 मधील रोटरी क्लब पिंपरी टाऊन चे माजी अध्यक्ष रो.अनिल नेवाळे यांनी स्वखर्च करून टेंभुर्णी रोटरी क्लबला उपलब्ध करून दिले आहेत, असे रोटरी क्लब टेंभुर्णी चे या प्रोजेक्टचे प्रोजेक्ट डायरेक्टर रो.नागेश कल्याणी यांनी सांगितले सदर स्टडी ॲप हे टेंभुर्णी मधील जनता विद्यालय, रयत विद्यालय, महात्मा फुले विद्यालय, कन्या प्रशाला या ठिकाणी मोफत देण्यात आले तर सनराइज् इंग्लिश मीडियम स्कूल व संत रोहिदास आश्रम शाळा टेंभुर्णी याठिकाणी इनरव्हील क्लब टेंभुरणी यांचेमार्फत मोफत वितरण करण्यात आले यावेळी रोटरी क्लब टेंभुर्णी चे सचिव उमेश रावळ प्रोजेक्ट डायरेक्टर नागेश कल्याणी रो.दीपक व्यवहारे रो.विनोद शिंदे आदी उपस्थित होते.
0 Comments