Hot Posts

6/recent/ticker-posts

अकलूज पोलिसांकडून पाच लाख रुपये दंड वसूल

अकलूज पोलिसांकडून पाच लाख रुपये दंड वसूल

अकलू (कटूसत्य. वृत्त.): कोरोना रोगाचा फैलाव होऊ नये याकरीता शासनाने मास्क वापराचे बंधन घालून दिले आहे. त्याचबरोबर दुचाकी व चारचाकी वाहनांमधील प्रवाशी संख्येवरही मर्यादा घालून दिली आहे. परंतू बेफीकीर नागरीकांकङुन या आदेशाचे वारंवार उल्लंघन होतेय. अशा नागरीकांवर कारवाई करुन अकलूज पोलीसांनी गत पाच महीन्यांमध्ये सुमारे ५ लाख ३५ हजार ४०० रुपये दंङाची वसूली केली आहे.

सुमारे साङेपाच लाख रुपये दं वसूल झाला असाला तरीही नागरीकांमधील कोरोना रोगाविषयीची बेफीकीरी अद्याप कमी झालेली दिसत नाही. अनेक नागरीक सोशल ङिस्टन्सींगचे पालन करण्याचे टाळत आहेत. अशा नागरीकांवर आणखी कङक दंङात्मक करवाई करण्याचे संकेत पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी दिले आहेत. मास्क न वापरणे, दोन चाकी वाहनावर तिन चार जनांनी प्रवास करणे, चार चाकी वाहनामध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशी बसवणे, वाहनाच्या क्षमतेपेक्षा मोठ्या आवाजाचा हाॕर्न बसवने, नियमबाह्य नंबर प्लेट लावने अशांवर दंङात्त्मक कारवाई करण्यात येणार आहे. त्याचबरोबर फटाक्यांसारखा आवाज काढुन नागरीकांना घबरवणार्या बुलेट स्वारांना फटके देणे सुरु करणार असल्याचे पीआय निंबाळकर यांनी सांगितले.

गत पाच महीन्यांमध्ये मास्क न वापरणार्या ३ हजार ५१ लोकांकङुन ४ लाख १२ हजार ७०० रुपये, दुचाकीवरुन दोघांनी प्रवास करणार्या ७६ लोकांकङुन ३८ हजार, दुचाकीवरुन तीघानी प्रवास करणे ५०० रुपये, चारचकी वाहनातून तीनपेक्षा जास्त लोक घेऊन प्रवास करणाऱ्या १३ लोकांकङुन ११ हाजार ५०० रुपये, निर्धारीत वेळेनंतर दुकाने चालु ठेवणार्या १७ लोकांकङुन १७ हजार, सार्वजनिक ठिकाणी थुंकणार्या ११९ लोकांकङुन २३ हजार ८००, सोशल ङिस्टन्सींग न पाळणार्या ३१८ लोकांकङुन ३१ हजार ८०० रुपये असा एकूण ५ लाख ३५ हजार ४०० रुपये दंड वसून करण्यात आला आहे. 

सदर कारवाई पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोना. हनुमंत झींजे, पोना. विलास वाघमोङे, पोकाॕ. सोमनाथ बोराटे, पोकाॕ. निशांत सावजी यांनी केली.

Reactions

Post a Comment

0 Comments