युवकांनी क्रिडा क्षेत्रात करिअर करावे - यशवंत शिंदे

लऊळ (क.वृ)(कालीदास जानराव): युवकांनी क्रीडा क्षेत्रातीही करीअर करण्यासाठी मोठी संधी असुन सर्व क्रिडा प्रकाराचा सराव करावा असे प्रतिपादन विठ्ठल शुगरचे कार्यकारी संचालक यशवंत शिंदे यांनी लऊळ ता. माढा येथे केले. प्रयास फाऊंडेशनच्या वतीने पै.गोविंद नलवडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्त भव्य स्टेनिस स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या या क्रिकेट सामन्याचे उद्घाटन शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी कुस्तीसम्राट आस्लम काझी, बॅक ऑफ इंडिया चे शाखा व्यवस्थापक नेताजी जाधव, प्रयास फाऊंडेशन चे अध्यक्ष बापूसाहेब नलवडे, पैलवान गोविंद नलवडे,आदी मान्यवर उपस्थित होते. या सामन्यासाठी चौदा गावातील संघांनी प्रवेश नोदवला असुन,हे सामने बाद पध्दतीने खेळले जातार आहेत. यासाठी विष्णु गवळी, वैभव कदम, नानासाहेब धडे, बबलु डिकोळे, बाळासाहेब धडे, दिनेश बिरकुटे, सुनिल माळी, रोहीत देवकर, करिम बागवान, रमजान बागवान, प्रवीण जानराव यांच्या सह युवक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments