Hot Posts

6/recent/ticker-posts

शहीद अशोक कामटे संघटनेच्यावतीने महात्मा फुले यांचा स्मृतिदिन साजरा

शहीद अशोक कामटे संघटनेच्यावतीने महात्मा फुले यांचा  स्मृतिदिन साजरा

सांगोला (क.वृ): सांगोला शहरात सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय  सामाजिक संघटनेच्यावतीने थोर समाजसुधारक, स्त्री शिक्षणाचे जनक, राष्ट्रपिता, क्रांतीसूर्य  महात्मा ज्योतिबा फुले यांचा  स्मृतिदिन  साजरा करण्यात आला.

सुरुवातीस संघटनेच्या स्टेशन रोड येथील तोरणा मुख्य कार्यालयात महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेचे पूजन मेथवडेचे मा .सरपंच जगदीश पाटील सर यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले, यावेळी स्टेशन रोड येथील प्रतिष्ठित व्यापारी चंद्रकांतकाका बनकर ,मोहिंदर( बाळू) बनकर ,महादेव जाधव ,सुहास नवले, विलास नवले ,यश नवले  ,ऍड .हर्षवर्धन चव्हाण, चारुदत्त खडतरे, अमोल शिनगारे ,शहाजी पाटील यांनी महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त फुले वाहून अभिवादन केले .यावेळी  पंढरपूरचे  विद्यमान आमदार  भारतनाना भालके  यांच्या आकस्मित दुःखद निधनाबद्दल  शहीद अशोक कामटे संघटनेच्यावतीने त्यांना  श्रद्धांजली  वाहण्यात आली, कार्यक्रमाचे प्रास्ताविक निळकंठ शिंदे सर यांनी केले . कार्यक्रम यशस्वीतेसाठी संघटनेच्या सर्व सदस्य व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Reactions

Post a Comment

0 Comments