Hot Posts

6/recent/ticker-posts

कुंभार घाट दुर्घटना : दोषी अधिकारी आणि ठेकेदाराला अटक झालीच पाहिजे महादेव कोळी समाजाची मागणी ; आंदोलनाचा इशारा

    कुंभार घाट दुर्घटना : दोषी अधिकारी आणि ठेकेदाराला अटक झालीच             पाहिजे ! महादेव कोळी समाजाची मागणी ; आंदोलनाचा इशारा


            पंढरपूर (प्रतिनिधी) :-  कुंभार घाटा लगतची भिंत कोसळून घडलेल्या दुर्घटनेत 6 जणांचा बळी जाऊन महिना-दीड महिना उलटून गेला तरी याला जबाबदार असलेल्या दोषी अधिकारी आणि ठेकेदाराला अद्याप अटक झालेली नाही, शासनाने मयताच्या वारसांना जी मदत जाहीर केली त्याची संपुर्ण पुर्तता अद्याप झालेली नाही. यामुळे संतप्त झालेल्या महादेव कोळी समाजाने आज कुंभार घाटानजीक दुर्घटना घडलेल्या ठिकाणी येऊन, ‘‘दोषी अधिकारी आणि ठेकेदारास अटक झालीच पाहिजे!, संबंधितांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे!, मयतांच्या वारसांना न्याय मिळालाच पाहिजे!  शासनाने दिलेले आश्‍वासन पाळलेच पाहिजे!’’ अशा घोषणा देत कार्तिकी वारीनिमित्त पांडुरंगाच्या शासकीय महापुजेस पंढरपूरला येत असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

            या दुर्घटनेसाठी जबाबदार असलेल्या दोषी ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालेला नाही यातील जलसंपदा विभागाचे अधिकारी सुध्दा आजही मोकाट फिरत आहेत. याकडे कोणीही लक्ष देत नाही. अजितदादा पवार यांनी यासंदर्भात बैठक लावुन दुर्घटनेची सखोल चौकशी करु असे आश्‍वासन दिले होते परंतु याबाबत कोणतीही कारवाई झालेली नाही. या दुर्घटनेत कोळी समाजातील 4 जणांचा जागीच मृत्यू झाला होता. त्यामुळे पंढरपूरमधील कोळी समाज बांधवात संतापाची लाट निर्माण झाली आहे. महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांचे नेतृत्वाखाली महादेव कोळी समाजातील असंख्य समाजबांधव आज घटनास्थळी दाखल झाले होते. यावेळी यावेळी पंढरपूरचे माजी नगराध्यक्ष बाबासाहेब अधटराव यांचेसह समस्त कोळी समाजातील संतप्त जमावाने प्रशासनाच्या व शासनाच्या निष्क्रीयतेविरुध्द घटनास्थळावर आक्रोश व्यक्त केला.

            यावेळी बोलताना गणेश अंकुशराव म्हणाले की, सदर दुर्घटनेत बळी गेलेल्या मयतांच्या कुटूंबियांना उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे आले होते तेंव्हा त्यांनी दिलेेल्या आश्‍वासनापैकी मृतांच्या वारसांना प्रत्येकी 4 लाख रुपयांची मदत मिळाली आहे, परंतु; मृतांच्या वारसांना मंदिर समितीमध्ये नोकरीस घेणे, महापुरात वाहुन गेलेली घरे पुन्हा नवीन ठिकाणी जागा उपलब्ध करुन बांधुन देऊ, ठेकेदार व अधिकार्‍यांची तात्काळ चौकशी करुन दोषींवर कठोर काररवाई करु, मयतांच्या वारसांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देऊ या आश्‍वासनांची पुर्तता अद्याप झालेली नाही. याची दखल कार्तिकी वारीच्या महापुजेस आल्यास अजितदादांनी करावी. निकृष्ट दर्जाचे काम करणार्‍या ठेकेदारांना व यात सामील असलेल्या अधिकार्‍यांना तात्काळ अटक करावी. त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. या मागण्यांसाठी आज आम्ही याठिकाणी ठिय्या आंदोलन केले. या मागण्यांचा विचार न केल्या कार्तिकी एकादशीच्या दिवशी आम्ही घटनास्थळावर तीव्र आंदोलन करु असा इशाराही  अंकुशराव यांनी दिला.

            यावेळी पंढरपूरचे माजी नगराध्यक्ष बाबासाहेब अधटराव, गणेश अंकुशराव, सतीश नेहतराव, मारुती संगीतराव, अनिल अभंगराव, धनंजय कोताळकर, कुमार संगीतराव, श्रीमंत परचंडे, मोहन सावतराव, दत्तात्रय अधटराव, बाबासाहेब अभंगराव, सचिन अभंगराव, नितीन अभंगराव, दत्ता माने, अरुण कांबळे, नानासाहेब करकमकर, उमेश संगीतराव, चंद्रकांत अभंगराव, नितीन अधटराव, सुरज कांबळे, सोमनाथ अभंगराव, वैभव अभंगराव,  रणजित कांबळे, अमर परचंडे, गणेश तारापुरकर, विनायक संगीतराव, संजय कोळी, अमर ननवरे, संतोष कोळी, राजु ननवरे, धीरज करकमकर, गणेश कोळी, प्रशांत शिरसट, सोमा कोळी, मृतांचे वारस व नातेवाईक तसेच महादेव कोळी समाजाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित हो

Reactions

Post a Comment

0 Comments