एकवेळ मी समुद्रात टाकलेली उडी लोक विसरले तरी चालेल पण माझा सामाजिक विचार लोकांनी विसरू नये असे सावरकर म्हणतात- कुलकर्णी
अकलूज (प्रतिनिधी) : - शंकरराव मोहिते राज्यशास्त्र विभाग आयोजित महापुरुषाची विचारधारा राष्ट्रीय प्रमाणपत्र अभ्यासक्रम ऑनलाइन व्याख्यानमालेत ते बोलत होते.पत्रकार संकेत कुलकर्णी औरंगाबाद यांनी सावरकर यांच्या व्यक्तीमत्वाचे विविध पैलूंचे सुंदर विवेचन केले. सावरकरांचे हिंदुत्व म्हणजे हिंदूंच्या एकत्त्वाची आणि त्यांच्या न्याय्य हक्क रक्षणाची संकल्पना आहे. महान देशभक्त, हिंदूत्ववादी, विज्ञानवादी,भाषा शुद्धीचे प्रवर्तक, यंत्र युगाचे समर्थक आणि प्रतिभासंपन्न कवी ज्यांनी अंदमानच्या एकांत कारागृहात भींतींवर कोळशाने कविता लिहील्या.
धर्माचा विचार न करता सर्व भारतीयांना समान हक्क, बुद्धिप्रामाण्यावर आधारित राज्यघटना आणि कायदे, धार्मिक अल्पसंख्याकांचा धर्म, भाषा आणि संस्कृतीला घटनात्मक संरक्षण असा त्यांचा न्याय्य हक्कांचा अर्थ होता. त्यांचं हिंदूराष्ट्र म्हणजे हिंदी राष्ट्रच होतं. नावाशिवाय त्यात हिंदू असं काहीच नव्हतं. त्यांचं हिंदुत्त्व म्हणजे हिंदू धर्म, हिंदुसंस्कृती, हिंदू तत्त्वज्ञान, हिंदू जीवनमूल्यं किंवा हिंदू जीवनपद्धती यांपैकी काहीही नव्हतं. सर्व धर्मग्रंथ आता कालबाह्य झालेले आहेत, असं त्यांचं आग्रही प्रतिपादन होतं. धर्माचं क्षेत्र फक्त पारलौकिक आणि आध्यात्मिक बाबींपुरतंच मर्यादित आहे, अशी त्यांची भूमिका होती. त्यांना आधुनिक मूल्यांवर आधारलेला अप टु डेट समाज हवा होता. त्यांनी मांडलेला सेक्युलॅरिझमच राज्यघटनेनं स्वीकारलेला आहे. या देशाचं नाव भारत असावं, अशी त्यांनी घटना समितीला विनंती केली होती. दु:खाची गोष्ट ही की सावरकरांचा हा विचार ना त्यांच्या विरोधकांनी वाचला, ना त्यांच्या अनुयायांनी स्वीकारला. सावरकरांचे विचार इतके स्पष्ट असतानाही अनेकजण समजू शकले नाहित. कोणीतरी रंगवलेले सावरकर वाचण्यापेक्षा मूळ सावरकर विचार वाचा म्हणजे खरे सावरकर समजून घेता येतिल अशी भुमिका सावरकर विचारांची सापेक्षता या विषयाची मांडणी करताना मा संकेत कुलकर्णी यांनी मांडली.
या व्याख्यानासाठी मा प्राचार्य डॉ आबासाहेब देशमुख, डॉ शंकर नवले प्राचार्य सिंहगड इजिनिरींग कॉलेज सोलापुर, प्राचार्य मीरा शेंडगे सोलापुर ईत्यादी मान्यवर उपस्थीत होते. प्रमुख पाहुण्यांची ओळख आणि प्रस्ताविक डॉ अतुल कदम कुर्डूवाडी यांनी केले तर आभार डॉ आणासाहेब नलावडे यांनी मानले ,सुत्रसंचालन डॉ विश्वनाथ आवड यांनी केले.
0 Comments