Hot Posts

6/recent/ticker-posts

मोहोळच्या कन्या प्रशाला चौकामध्ये भुयारी मार्ग व्हावा यासाठी ज्योती क्रांती परिषदेचे आमरण उपोषण सुरू - प्रदेशाध्यक्ष रमेश बारसकर यांनी भेटून दिला पाठिंबा

मोहोळच्या कन्या प्रशाला चौकामध्ये भुयारी मार्ग व्हावा यासाठी ज्योती क्रांती परिषदेचे आमरण उपोषण सुरू - प्रदेशाध्यक्ष रमेश बारसकर यांनी भेटून दिला पाठिंबा

मोहोळ (क.वृ.): गेली पाच ते सहा वर्ष पासून प्रलंबित असलेल्या मोहोळ शहरातील कन्या प्रशाल चौक येथे भुयारी मार्ग तसेच शहरासाठी सर्व्हिस रोड व्हावा या प्रमुख मागणी संदर्भात आज पासून ज्योती क्रांती परिषद यांच्यावतीने व प्रदेशाध्यक्ष रमेशजी बारसकर यांच्या मार्गदर्शनाखाली व नुतन नगरसेवक अतूल क्षिरसागर यांच्या नेतृत्वाखाली आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे. दरम्यान या आंदोलनाला मोहोळचे प्रथम नगराध्यक्ष तथा ज्योती क्रांती परिषदेचे  प्रदेशाध्यक्ष रमेश बारसकर यांनी भेट देऊन या अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी पाठिंबा दिला आहे.

मोहोळ शहर हे चाळीस ते पंचेचाळीस हजार लोकसंख्या असलेले शहर आहे.सदरच्या कन्या प्रशाला चौकाच्या लगत मोठी महाविद्यालय,प्राथमिक शाळा व वर्दळीचा रस्ता असल्यामूळे याठिकाणी भुयारी मार्ग होणे अत्यंत गरजेचे आहे.या मागणी करिता आज पर्यत विविध निवेदने,आंदोलने करून देखिल याची दखल घेतली जात नाही. राष्ट्रीय राज्य महामार्ग प्राधिकरण प्रशासनाच्या चूकीच्या धोरणामूळे  आज पर्यत शेकडो लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.शिवाय अनेकांना अपगंत्व देखिल आले आहे.

याकरिता कन्याप्रशाला चौकामध्ये भुयारी मार्ग व सर्व्हिस रोड व्हावा म्हणून ज्योती क्रांती परिषदेच्या वतीने कन्याप्रशाला चौकामध्येच आमरण उपोषणाला सुरूवात केली आहे.यावेळी या उपोषण आंदोलनामध्ये  शिलवंत क्षिरसागर,युवक कार्याध्यक्ष सागर अष्टुळ,शहराध्यक्ष सोमनाथ भालेराव,संघटक धनजंय माने,विद्यार्थी आघाडीचे तालुकाध्यक्ष सिद्धार्थ एकमल्ले बसलेले आहेत.

२०१४ पासुन हायवे झाल्या पासुन
आत्तापर्यंत  शंभर ते दीडशे लोकांचे बळी गेले आहेत. तसेच अनेक जणांना अपंगत्व आले आहे. तसेच  कन्या प्रशाले चौकालगत तीन महाविद्यालये आहेत. या चारही महाविद्यालयात मिळून कमीत कमी 2000 ते 2500 विद्यार्थी रोज येतात. आणि तसेच आसपासच्या शेजारील गावामधून ही अनेक लोकांची वर्दळ असते. हे लक्षात घेता कन्या प्रशाला चौक मृत्यू चौक झाला आहे आणि येणाऱ्या काही दिवसा मध्ये जर प्राधिकरण विभागाने दखल घेतली नाही तर होणाऱ्या परिणामास सर्वस्वी जवाबदार राहणार आहे.
Reactions

Post a Comment

0 Comments