दारूमुक्त, व्यसनमुक्त व कर्जमुक्त महाराष्ट्रासाठी संभाजी ब्रिगेड हाच एकमेव पर्याय - खेडेकर

सोलापूर (क.वृ.):- दारूमुक्त, व्यसनमुक्त व कर्जमुक्त महाराष्ट्र करण्यासाठी संभाजी ब्रिगेड हाच एकमेव पर्याय असल्याचे मत मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर यांनी दैनिक कटूसत्य शी बोलताना व्यक्त केले.
ॲड. पुरुषोत्तम खेडेकर हे पुणे पदवीधर मतदारसंघातील संभाजी ब्रिगेडचे अधिकृत उमेदवार मनोजकुमार गायकवाड यांच्या प्रचारार्थ सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. त्यानिमित्ताने खेडेकर यांनी दैनिक कटू सत्य व सोलापूर वृत्तदर्पण न्यूज चैनलच्या कार्यालयात भेट दिली त्या प्रसंगी ते बोलत होते. प्रारंभी पुस्तक देऊन व घेऊन संपादक पांडुरंग सुरवसे व उपसंपादक सचिन जाधव यांनी पाहुण्यांचा सत्कार केला. यावेळी मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष प्रा. अर्जुन तनपुरे, जिल्हाध्यक्ष प्रशांत पाटील, सदाशिव पवार, नागेश श्रीचीप्पा व दीपक भोसले उपस्थित होते.
ॲड. पुरुषोत्तम खेडेकर पुढे बोलताना म्हणाले की, महाराष्ट्रातील मराठा नेत्यांनी जाणीवपूर्वक मराठा समाजाला आरक्षण पासून कोसो दूर ठेवले आहे. तर सर्वच सध्याच्या राजकीय पक्षांनी युवकांना बेरोजगार करून शेतकऱ्यांना देशोधडीला लावून महाराष्ट्राचे वाटोळे केल्याचा खणखणीत आरोप केला. सर्वच राजकारण्यांचा खरपूस समाचार घेताना खेडेकर म्हणाले म्हणूनच संभाजी ब्रिगेड ने महाराष्ट्राच्या जनते समोर संभाजी ब्रिगेड च्या माध्यमातून चांगला पर्याय ठेवलेला आहे. त्या पर्यायची सुरुवात करण्यासाठी पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा व सोलापुरातील सुज्ञ व सुशिक्षित मतदार मनोज कुमार गायकवाड यांना आपले पहिल्या पसंतीचे मत देऊन निवडून आणणार यात तिळमात्र शंका नाही, असा विश्वासही शेवटी खेडेकर यांनी बोलून दाखविला.
आधी केले नंतर सांगत आहोत
विदर्भ आणि मराठवाडा भागातील जवळपास 250 ग्रामपंचायतीवर संभाजी बिग्रेड चे वर्चस्व आहे. त्या सर्व ग्रामपंचायती स्वच्छ सुंदर, दारूमुक्त, व्यसनमुक्त व कर्जमुक्त आहेत. त्यामुळे आधी करतो मग सांगतो या युक्तीप्रमाणे वागणारा एकमेव संभाजी बिग्रेड हा पक्ष आहे.
0 Comments