आमदार भारत भालके यांची प्रकृती स्थिर, अफवांवर विश्वास ठेवू नका - मारुती जाधव

पंढरपूर (क.वृ.): पंढरपूर मंगळवेढ्याचे लोकप्रिय आमदार भारत भालके यांची प्रकृती स्थिर असून जिल्यातील जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये, ते उपचारास प्रतिसाद देत आहेत, अशी माहिती राष्ट्रवादी किसान सेलचे जिल्हाध्यक्ष मारुती जाधव यांनी दिली.
आमदार भालके यांच्यावर गेल्या महिन्यापासून रुबी हॉस्पिटल पुणे येथे उपचार सुरू आहेत.कालपासून जिल्यातील लोकांमध्ये आणि सोशल मीडियावर सर्वत्र त्यांची प्रकृती ढासळली असल्याची चर्चा पसरली आहे.त्याअनुषंगाने भारत भालके यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी, यासाठी प्रार्थना करीत आहेत.
0 Comments