26/11 शहीद दिनानिमित्त करकंब मध्ये 55 जणानी केले रक्तदान

करकंब (क.वृ.): युवाशक्ती समूह करकंब व पोलिस स्टेशन करकंब यांच्या संयुक्त विद्यमानाने शहीद दिनानिमित्त करकंब ता.पंढरपूर येथे रक्तदान शिबीर संपन्न झाले.या वेळी 55 रक्तदात्यांनी रक्तदान केलं. दि 26 नोव्हेंबर रोजी करकंब येथील मारुती मंदिरात हे रक्तदान शिबिरामध्ये प्रथम रक्तदाता परमेश्वर नलावडे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
यावेळी बजाज ब्लड बँकेचे डॉ. एस.एम.पाटील, डॉ. किरण धोंगडे,ए .एम .पी कवडे, कोरे,बागल, देशपांडे, आकाश मोरे, पैलवान, औदुंबर कुंभार, आतुला अभंगराव, मंगेश शिंदे, तुकाराम शिंदे, गजानन शिंदे, हरिश्चंद्र फाऊंडेशनचे संस्थापक कृष्णात गायकवाड,वाहतूक शाखेचे विजय गोरवे, युवाशक्तीचे प्रवक्ते सचिन शिंदे असून यासाठी बजाज ब्लड बँक पंढरपूर यांच्या सहकार्याने मुंबई येथील दहशतवादी हल्ल्यांमध्ये सर्व शहीद जवान व पंढरपूरचे वीर सुपुत्र मेजर कुणाल गोसावी यांच्या स्मरणार्थ रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. करकंब परिसरातील युवकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देऊन रक्तदान शिबिर यशस्वीरित्या पार पडले, अशी माहिती युवाशक्तीचे प्रवक्ते सचिन शिंदे यांनी दिली.
0 Comments