Hot Posts

6/recent/ticker-posts

मोहोळच्या वाहतुकीला शिस्त लावणारे पोलीस निरीक्षक कोकणे आता जिल्हा वाहतूक शाखेला

 मोहोळच्या वाहतुकीला शिस्त लावणारे पोलीस निरीक्षक कोकणे आता जिल्हा वाहतूक शाखेला

 तर पुणेरी पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांची नियुक्ती



मोहोळ (क. वृ):- मोहोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांची बदली सोलापूर ग्रामीण वाहतूक शाखेला  बदली झाली असून त्यांच्या जागेवर निरीक्षक अशोक सायकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रविवारी सकाळी अकरा वाजता नूतन पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांनी पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्याकडून पदभार स्वीकारला. 
               पोलीस निरिक्षक सुर्यकांत कोकणे यांनी २७ महिने कार्यरत असलेल्या कोकणे यांनी मोहोळ तालुक्यात कायदा व सुव्यवस्था आबाधीत ठेवण्याबरोबर तालुक्यातील शाळा कॉलेज बसस्थानक पारिसरातील रोडरोमीओं  टवाळकी करत फिरणाऱ्या युवकांना दामिनी पथकाना सक्त सुचना देवुन आळा घालण्याचा प्रयत्न केला. पोलीस निरीक्षक कोकणे यांचा बदलीचा कालावधी यापूर्वीच पूर्ण झाला होता. मात्र कोरोणाच्या परिस्थितीमुळे त्यांची बदली लांबली. मोहोळ शहरातील वाहतूक पोलीस करून त्याने वहानधारक यांना कधी कागदपत्रे नाहीत कधी पीयूसी आणि लायसन नाही कधी हेल्मेट नाही तर तोंडाला मास्क लावला नाही म्हणुन अशा अनेक कारणाने कारणाने  वाहतूक व्यवस्थेला शिस्त लावण्याचे काम केले. मात्र वाळूच्या बेकायदा उपसा, आणि चोरीला ते अटकाव करू शकले नाहीत. माजी आ रमेश कदम अध्यक्ष असलेल्या आण्णाभाऊ साठे गैरव्यवहार प्रकरणातील जप्त केलेल्या महागाड्या आलिशान गाड्या यांचे स्पेअर पार्ट मोठ्या प्रमाणात चोरीस गेले होते त्याची देखील चौकशी झाली नाहीच शिवाय गुन्हेगार सापडले नाही पो.नि.कोकणे यांनी गाड्यांच्या गेलेल्या स्पेअरपार्ट ची चौकशी न करता पोलीस स्टेशनच्या पाठीमागील छोटा रस्ताच बंद करून चोऱ्या थांबवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे माजी सरपंच बिलाल शेख यांनी याविषयी तक्रार करून आंदोलन  देखील केले होते. अशा एक ना अनेक घटनांमुळे मोहोळ पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे हे वादादित झाले होते. आता बदलून आलेले पोलीस निरिक्षक अशोक सायकर यांच्यासमोर अनेक आव्हाने असून त्याला ते तोंड कसे देतात यावर अवलंबून आहे. 

मोहोळचे नूतन पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांनी यापूर्वी सोलापूर ग्रामीण पोलीस दलात सेवा बजावली असून त्यांनी सात वर्षापूर्वी कामती पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक पदाची धुरा सांभाळली आहे. त्यानंतर पदोन्नती होऊन ते पुणे ग्रामीणला नियुक्त झाले.आता यावेळी सोलापूर ग्रामीण पोलीस दलात येण्यापूर्वी त्यांनी पुणे ग्रामीण पोलीस दलात सेवा बजावली आहे. अवैध दारू अवैद्य गुटका अवैध वाळू याशिवाय जुगाराचे आणि मटका या अवैध व्यवसायिकांची पाळेमुळे नूतन पोलीस निरीक्षक सायकर कसे खणून काढतात. याकडे संपूर्ण शहर आणि तालुक्यातील लक्ष लागले आहे.
Reactions

Post a Comment

0 Comments