अर्णब गोस्वामीच्या अटकेचा सांगोला तालुका भाजपच्या वतीने निषेध
सांगोला क.वृ : आघाडी सरकारने सुडापोटी रिपब्लिक टिव्हीचे पत्रकार अर्नब गोस्वामीला केलेल्या अटकेच्या निषेधार्थ भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांतदादा देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत तालुकाध्यक्ष चेतनसिह केदार सावंत आणि सांगोला तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने निषेध व्यक्त करत तहसील कार्यालयास निवेदन दिले.
महाविकास आघाडी सरकारने वास्तुविशारद आत्महत्या प्रकरणाची २०१८ साली बंद झालेली फाईल पुन्हा उघडून सुडापोटी रिपब्लिक भारत टीव्हीचे पत्रकार अर्नब गोस्वामी यांना अटक केली आहे. महाराष्ट्रात हुकुमशाही पद्धत लागू करण्याचे स्वप्न आघाडी सरकार पाहत आहे. मात्र संपूर्ण महाराष्ट्रातील जनता व भारतीय जनता पार्टी हे स्वप्न पूर्ण कधीही पूर्ण होऊ देणार नाही. आजच्या पिढीला तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या आणीबाणीची आठवण करून देण्याचा प्रयत्न आघाडी सरकारने केला आहे. मात्र त्यावेळी जनतेने सरकारला संविधानाच्या विरुद्ध कारवाई करताना थांबवले होते. आता देखील महराष्ट्रातील जनता व भारतीय जनता पार्टी हे थांबवणार आहोत.
पत्रकार अर्नब गोस्वामीला अटक करण्याची घटना हि लोकशाहीची गळचेपी करणारी घटना असून भारतीय जनता पार्टी सांगोला व सांगोला तालुकाध्यक्ष या नात्याने त्याहून भारतीय नागरिक म्हणून या घटनेचा तीव्र निषेध करत असल्याचे भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांतदादा देशमुख व तालुकाध्यक्ष चेतनसिह केदार सावंत यांनी सांगितले. यावेळी आघाडी सरकारचा निषेध करणारे भाजपच्या वतीने निवेदन तहसीलदार योगेश खरमाटे यांना दिले आहे. यावेळी डॉ.जयंत केदार, मधुकर पवार, माणिक सकट, संग्राम गायकवाड, मानस कमलापूरकर, प्रवीण जानकर, शिवाजी ठोकळे, दत्ता जाधव, संजय केदार, नवनाथ केदार, सुरेश चौगुले, ओंकार कुलकर्णी, दीपक केदार, राहुल केदार, उमेश मंडले, राहुल केदार, सोयजित केदार, गणेश केदार, राहुल केदार, दीपक केदार आदी उपस्थित होते.
0 Comments