Hot Posts

6/recent/ticker-posts

खंडाळी गावाची ग्रामपंचायत निवडणुक बिनविरोध करण्याकडे वाटचाल

 खंडाळी गावाची ग्रामपंचायत निवडणुक बिनविरोध करण्याकडे वाटचाल

मोहोळ (क. वृ):खंडाळी (ता.मोहोळ) या गावाच्या  ग्रामपंचायत ची निवडणुक हि बिनविरोध करण्यासंदर्भात झालेल्या ग्रामसभेत सर्व पार्टी प्रमुख व पार्टीतर्फे आलेल्या मान्यवरांनी ग्रामपंचायत निवडणुका हि बिनविरोध व्हावी यास सहमती दर्शविली आहे. गावातील मारूती मंदिरात झालेल्या या सभेत सर्वांनीच सहमती दर्शवली. कारण निवडणूकांमधून गावास दरवेळी अत्यंत वाईट स्वरूप आले जाते व यामूळे नाहक त्रास सर्वसामान्यांना भोगावा लागतो. काहीजनांची चैन होते पण अनेक घरात यादरम्यान वाद होऊन प्रकरण गंभीर स्वरूप घेते. तसेच शासन स्तरापासून ते सर्व सामान्य माणसांसाठी हि एक पैशाची बचतही होऊ व यातून शासनाचे विविध योजना व पुरस्कार गावाला मिळतील तसेच यातून पुढील पिढ्यांना एक आदर्श विचार ही यामुळे मिळेल. ग्रामपंचायत निवडणुका मधील  असंख्य वाद व नाहक त्रास हे सर्व टाळण्यासाठी सर्व नेते व सर्व सामान्य माणसे आज एकत्र आली.  गावातील तरुणांनी बिनविरोध निवडणूक चा संकल्प  प्रस्ताव समस्त ग्रामस्थ खंडाळीकर यांच्या समोर ठेवला. यावर गावातील  सर्व पार्टी प्रमुख सर्वसामान्य जनतेतून मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन व सहकार्य मिळाले. यावेळी श्री. लक्ष्मण मुळे (तात्या),बाळासाहेब मुळे, उत्तम मुळे, शामराव  कोळी ,पंपू श्रीखंडे, अतुल भोसले,बाळासाहेब कदम, नागनाथ माळी, सुरेश माळी, समाधान माळी, हणमंत माळी, बळी पवार, राजू माळी, तानाजी मुळे, शाहु भोसले, समाधान खुर्द, लक्ष्मण मुळे, विनोद पाटील, मच्छिंद्र मुळे,बापू मंगळे,इसू बापू,.एम. आर. मुळे. रमेश जाधव, अंदु कवडे,. महादेव पाटील, गणेश मुळे,. चिंतन मुळे, सुहास तरटे,रवि शेळके,  नारायण मुळे, सागर कुंभारगणेश पाटील,. शरद काळे,शिवाजी जाधव, विठ्ठल भोसले, नामदेव शिरतोडे ,शिवाजी शिरतोडे,पोलिस पाटील दादासाहेब पाटील 
यासंदर्भात दुसरी महत्वपूर्ण बैठक शनिवार दिनांक 7 नोव्हेंबर 2020 रोजी सायंकाळी 7. 30 वाजता श्री. मारुती मंदिर खंडाळी येथे आयोजित केली आहे.

 तसेच इतरही काही ग्रामस्थ उपस्थित होते 

Reactions

Post a Comment

0 Comments