Hot Posts

6/recent/ticker-posts

भीमा,सहकार शिरोमणी,गोकुळ व सिताराम कारखान्याने उसाची थकीत एफआरपी जमा करावी अन्यथा एक उसाचे कांड गव्हाणीत टाकू देणार नाही प्रभाकर देशमुख

 भीमा,सहकार शिरोमणी,गोकुळ व सिताराम कारखान्याने उसाची थकीत एफआरपी जमा करावी अन्यथा  एक उसाचे कांड गव्हाणीत टाकू देणार नाही  प्रभाकर देशमुख 


मोहोळ (क. वृ):तालुक्यातील  भीमा कारखाना  व पंढरपूर तालुक्यातील सहकार शिरोमणी या कारखान्यांनी दोन वर्षापूर्वीची थकित एफ आर पी ची व्याजासहित अजून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा न करता बॉयलर व मुळी पूजा केली. परंतु आता एफ आर पी दिल्याशिवाय कारखाने चालू होऊ देणार नाही या मागणीचे निवेदन जनहीत संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांनी पंढरपूर- मोहोळ विभागाचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांना प्रत्यक्ष भेटून दिले आहे.गेल्या दोन वर्षापासून भीमा,सहकार शिरोमणी व सिताराम कारखाना यांनी एफआरपीतील फरक दिलेला नाही व सितारामने तर एफआरपी तला एक दमडा रुपया शेतकऱ्यांच्या खात्यावर अद्याप जमा केलेला नाही तसेच गोकुळने ही गेल्या नऊ महिन्यांपासून एफ आर पी चे व कामगारांच्या दहा महिन्यांच्या पगारी व पीएफ जमा केलेले नाही या चाललेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी जनहित शेतकरी संघटनेच्या वतीने प्रभाकर देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर जिल्हाधिकारी व पंढरपूर तहसील कार्यालय समोर विविध प्रकारची आंदोलने केली होती.या आंदोलनाची दखल घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक लावली गेली बैठकीमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी गोकुळ,भीमा  सहकार शिरोमणी,सिताराम या कारखान्याच्या कार्यकारी संचालकांना 15 ऑक्टोबर पर्यंत ऊस उत्पादकांच्या उसाची एफआरफी चे व गोकुळच्या कामगारांच्या पगारी त्वरित त्यांच्या खात्यावर जमा कराव्यात  असा आदेश केला होता परंतु अद्याप या कारखानदारांनी या आदेशाचे पालन केलेले नाही. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी याकडे दुर्लक्ष न करता यात लक्ष घालून लवकरात लवकर बैठक बोलवावी अन्यथा गोकुळ,भीमा सहकार शिरोमणी व सिताराम हे चारही कारखाने चालू होऊ देणार नाही.असे आवाहन ही जनहित चे प्रभाकर देशमुख यांनी केले आहे. वेळप्रसंगी शेतकरी व कार्यकर्ते आम्ही गव्हाणीत उड्या टाकू असा गर्भित इशाराही दिला आहे. यात होणाऱ्या परिणामास साखर आयुक्त साखर सहसंचालक व जिल्हा अधिकारी व चेअरमन हेच जबाबदार राहतील  कारखान्यांना गाळप परवाना देऊ नये अशीही मागणी साखर आयुक्त व साखर सहसंचालकाकडे देशमुख यांनी केली आहे  यावेळी वेळी युवक जिल्हाध्यक्ष श्रीकांत नलवडे, विकास जाधव, चंद्रकांत निकम,ज्ञानेश्वर भोसले, अण्णासाहेब वाघचौरे,सुरेश नवले, मारुती भुसनर,सचिन आटकळे,सुनील पुजारी,धर्मराज पुजारी,सुनील पाटील,सुभाष शेंडगे,बाळासाहेब सपाटे, उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments