Hot Posts

6/recent/ticker-posts

शिक्षक मतदारसंघातून सचिन नागटिळक निवडणूक लढणार;प्रहार शिक्षक संघटना निवडणूकीच्या रिंगणात

 शिक्षक मतदारसंघातून सचिन नागटिळक निवडणूक लढणार;प्रहार शिक्षक संघटना निवडणूकीच्या रिंगणात


सोलापूर (क.वृ.) - प्रहार शिक्षकसंघटना ही नोंदणीकृत संघटना असून संघटनेने मागील अनेक वर्षांपासून शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर वेगवेगळ्या माध्यमातून आवाज उठवून शिक्षकांना न्याय मिळवून देण्याचे पूरेपुर प्रयत्न केला आहे. संघटनेचा आक्रमक पवित्रा आणि हाती घेतलेला विषय तडीस नेण्याची सवय यामुळे आजपर्यंत अनेक प्रश्न मार्गी लावण्यात आपल्या संघटनेला यश मिळालेले आहे. 

                     सोलापुरातील शिक्षकांचे वेतन राष्ट्रीयकृत बँकेतून वेतन काढणे, सेवापुस्तक अद्ययावत करणे, शिक्षक समायोजन, अर्धवेळ शिक्षकांचा प्रश्न, शिक्षकांना फरक बिले मिळवून देणे, शिक्षकांचे वैद्यकीय बिल मिळवून देणे संघटनेने तडीस नेले आहत. सरसकट सर्वच शिक्षकांना जूनी पेन्शन मिळावी या मागणीसाठी झालेल्या आंदोलनात संघटना वेळोवेळी सक्रीय सहभागी राहिलेली आहे. कोविड १९ सारख्या महामारी काळात देखील शिक्षकांना कार्यमुक्त करणे अथवा शिक्षकांच्या ड्यूटी मध्ये बदल करण्यामध्ये संघटनेने मोलाची भूमिका बजावली आहे. आक्रमक पवित्रा घेत शासनाकडून शिक्षकांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात आंदोलन करून शिक्षकांना न्याय मिळवून दिला आहे. नुकतीच पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर झालेली असून पुणे विभागातील असंख्य शिक्षक बंधूभगिनींच्या आग्रहास्तव प्रहार शिक्षक संघटनेच्या वतीने संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सचिन मारुती नागटिळक यांना उमेदवारी जाहीर करत असल्याचे संघटनेचे सहसचिव प्रताप दराडे, जिल्हा उपाध्यक्ष हणुमंत चव्हाण, जिल्हा कार्याध्यक्ष अनिल पाटील, जिल्हा संघटक अतुल पाडे, रामेश्वर सोलापूरे यांनी सांगितले. 

                              या पत्रकार परिषदेस जिल्हा कोषाध्यक्ष रियाजअहमद अत्तार, शहराध्यक्ष राजेश काडादी, शशिकांत पाटील, प्रकाश अतनूर, पल्लवी शिंदे, राजकुमार देवकते, अनुप कस्तुरे, बाळासाहेब कापसे, दत्तात्रय शेळके, सचिन सरवदे, राजकुमार तेली, सुरेश शिंदे, आदी उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments