सोलापुरात प्रथमच 25 रूपयात 140 कि.मी. धावणारी EVOAIS ई-स्पोर्ट्स बाईक दाखल
सोलापूर (क.वृ.): - सोलापूरच्या स्मार्ट सिटीत प्रथमच 25 रूपयात 140 कि.मी. अंतर धावणारी RTO मान्यताप्राप्त EVOQIS ई-स्पोर्ट्स बाईक , HAWK-ई-स्कुटर आणि RACER-ई स्कुटर सोलापूरातील राज ॲटोमोबाईल्स , डी-फार्मसी कॉलेज जवळ, विजापूर रोड, जुळे सोलापूर येथे दाखल झाली असून रविवार दि.08 नोव्हेंबर 2020 रोजी सायं.5.00 वा. पत्रकार संघाचे अध्यक्ष मा.विक्रम खेलबुडे यांच्या शुभहस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे. सदर कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष राजू राठी, सोलापूर जिल्हा यंत्रमाग संघाचे चेअरमन पेंटप्पा गड्डम, सुविद्या प्रकाशनचे संचालक बाबूराव मैंदर्गीकर, सेंट्रल रेल्वेचे सोलापूरातील ऑफीस सुप्रिंमटेंडेड अतुल स्वामी इ. उपस्थित राहणार असल्याचे राज अॅटोमोबाईल्सचे संचालक बसवराज येरनाळे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. भारत सरकारने "नॅशनल इलेक्ट्रीक मोबिलिटी प्लॅन अंतर्गत 60 लाख इलेक्ट्रीक व हायब्रीड वाहने रस्त्यावर उतरविण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.” तसेच महाराष्ट्र शासनाने "महाराष्ट्र राज्य हे जागतिक स्तरावर इलेक्ट्रीक व्हेईकल व त्यांच्या सुट्या भागांचे उत्पादन आणि जास्तीत जास्त इलेक्ट्रीक व्हेईकल वापर करणारे स्पर्धात्मक राज्य बनविण्याचा निर्णय जाहीर केलेला आहे.” त्यानुसार राज्यात नोंदणी झालेल्या इलेक्ट्रीक व्हेईकलच्या वैयक्तिक खरेदीदारांना ई-दुचाकी वाहनांकरिता रू.5000/- कमाल मर्यादेत "अंतिम वापरकर्ता अनुदान” मिळणार आहे. इलेक्ट्रीक व्हेईकल्समुळे जागतिक स्तरावर व देशाअंतर्गत पेट्रोलियम पदार्थावरील अवलिंबत्व कमी होणार आहे. HAWK प्लस ई-स्कुटर मध्ये 3 वर्ष वॉरंटी असलेली Lithium-ion बॅटरी असल्यामुळे 20 रूपयात 170 कि.मी. अंतर धावणार असल्यामुळे नागरिकांच्या पेट्रोल इंधनावर मोठ्या प्रमाणात होणारा खर्च वाचणार आहे. तसेच सदर वाहन वायू व ध्वनी प्रदुषण मुक्त असल्यामुळे नागरिकांचे आरोग्य उत्तम राहण्यास मदत होणार आहे. त्यामुळे 'इलेक्ट्रीक व्हेईकल तंत्रज्ञान' हे यापुढील कालावधीत जागतिक स्तरावर दळणवळणाच्या क्षेत्रात आमुलाग्र बदल घडवून आणणारी बाब ठरणार आहे. सदर पत्रकार परिषदेस राज ॲटोमोबाईल्सचे संचालक बसवराज येरनाळे (मो.9860118384), ऑल इंडिया कोष्टी फेडरेशनचे महासचिव शिवप्पा कोट्टलगी सर , राजू करनूर इ. उपस्थित होते.
0 Comments