सतीश सावंत यांचे नाव उपनगराध्यक्ष पदासाठी आघाडीवर
सांगोला (क.वृ.):- सांगोला नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी नगरविकास आघाडीतील कोणाची वर्णी लागते.याबाबत नागरिकांना उत्सुकता लागली आहे.विद्यमान उपनगराध्यक्षा भामाबाई जाधव या आठवड्याभरात राजीनामा देणार आहेत. त्यामुळे सध्यातरी उपनगराध्यक्ष पदासाठी आघाडीकडून नगरसेवक सतीश सावंत यांचे नाव आघाडीवर आहे .
विद्यमान उपनगराध्यक्षा भामाबाई जाधव यांची एक वर्षाची मुदत संपणार असल्याने सध्या उपनगराध्यक्ष पदासाठी रस्सीखेच सुरू आहे . नगरविकास आघाडीकडून उपनगराध्यक्ष पदासाठी अनेकजण इच्छुक असल्याने हा कालावधी सहा महिन्याचा करावा असेही बोलले जात आहे . माजी आमदार गणपतराव देशमुख व माजी आमदार दीपकआबा साळुखे - पाटील यांच्यात चर्चा झाल्यानंतर उपनगराध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार हे स्पष्ट होणार असले तरी यात नगरसेवक सतीश सावंत यांचेच नाव आघाडीवर असल्याची चर्चा आहे .
पुढील वर्षी नगरपरिषदेची निवडणूक होणार असल्याने निदान शेवटच्या टर्ममध्ये तर उपनगराध्यक्षपद मिळावे ही सुप्त इच्छा असली तरी श्रेष्ठी कोणता निर्णय घेतात याकडे इच्छुकांचे लक्ष लागून राहिले आहे . आता नाही तर पुन्हा कधीच नाही यामुळे उपनगराध्यक्ष पदासाठी इच्छुकांनी कंबर कसली आहे . श्रेष्ठीनी इच्छुकांशी बंद खोलीत सल्लामसलत करून शब्द दिला असल्याची चर्चा असली तरी ऐनवेळी काय होते हे पाहणे औत्सुक्याचे आहे .
सांगोला नगरपरिषदेच्या सार्वत्रिक पंचवार्षिक - निवडणूक २०१६ साली घेण्यात आलेल्या निवडणुकीत शहर विकास महायुतीच्या राणी माने या जनतेतून लोकनियुक्त नगराध्यक्षा म्हणून निवडून आल्या.या निवडणुकीत नगरविकास आघाडी ११ , शहर विकास महायुती ८ तर एका जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाले . आतापर्यंत नगरविकास आघाडीकडून सुरेश माळी , चेतनसिह केदार - सावंत , स्वाती मगर , भामाबाई जाधव यांना उपनगराध्यक्ष पदाची संधी देण्यात आली आहे . पुढील वर्षी सांगोला नगरपालिकेची पंचवार्षिक निवडणूक होणार असल्याने उर्वरित एक वर्षासाठी नगरसेवक सतीश सावंत यांना उपनगराध्यक्षपदाची संधी मिळणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे . नगरविकास आघाडीकडून घटक पक्षांतील सर्वांना संधी मिळावी म्हणून प्रत्येक वर्षी उपनगराध्यक्षपदी निवड केली जाते .

0 Comments