जलोळी येथे शेतकऱ्यांना कृषी दूतांकडून कडून औषधे फवारणी विषयी मार्गदर्शन संपन्न.
करकंब (क.वृ.):- महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी जळगाव येथील डॉक्टर उल्हास पाटील कृषी विद्यालयातील परमेश्वर ज्ञानेश्वर नरसाळे यांनी शेतकऱ्यांना जागृतता व औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमाद्वारे जलोळी ता- पंढरपूर येथे शेतकऱ्यांना फळबागांमध्ये जिवाणू खते व औषधे वापरणे विषयी मार्गदर्शन केले .बहुवार्षिक फळबागांना विविध प्रकारच्या रोगांपासून व त्यापासून बचाव करण्यासाठी विषमुक्त शेती करण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन केले.
त्यामध्ये अझोरोबेक्टर स्फुरद विरघळणारे जिवाणू, रायझोबियम ट्रायको डरमा, बीजप्रक्रिया केल्यामुळे उत्पादनात वाढ होते हे लक्षात आणून दिले. त्यामुळे रासायनिक खतांचा वापर कमी होऊन शेतकऱ्यांच्या खर्चात बचत होते हे लक्षात आणून दिले, तसेच मेटारायझम मुळे आंबा पिकांमधील हुमणीचा नायनाट कसा होतो हे दाखवून दिले. बॅसिलस सबटिलस यामुळे जैविक औषधांद्वारे मात करता येते हे पटवून दिले. आज-काल रासायनिक खते व कीटकनाशके त्यामुळे मानवाच्या आरोग्यास बाधा होत आहे, त्यामुळे जैविक खते व औषधे वापरल्यामुळे मानवाच्या आरोग्यावर काहीही परिणाम होत नाही व त्यांच्या जमिनीवर ही दुष्परिणाम होत नाही याची माहिती गावातील व पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना दिली.
कृषी अभ्यास दौरा पूर्ण करण्यासाठी ज्ञानेश्वर नरसाळे यांनी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस एम पाटील उपप्राचार्य पी सी देवरे कार्यक्रम समन्वयक प्रा. फापळे यांचे मार्गदर्शन लाभले.
0 Comments