Hot Posts

6/recent/ticker-posts

जिल्हाधिकारी यांच्या सक्तीची वसुली स्थगितीच्या आदेशाला मायक्रो फायनान्स व बचत गट अधिकाऱ्यांनी दाखवली केराची टोपली

 जिल्हाधिकारी यांच्या सक्तीची वसुली स्थगितीच्या आदेशाला मायक्रो फायनान्स व बचत गट अधिकाऱ्यांनी दाखवली केराची टोपली


सांगोला(क.वृ.):-  सोमवारी तहसील कार्यालयासमोर मनसेच्या वतीने बचत गटातील महिलां समवेत धरणे आंदोलन : विनोद भाई बाबर संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी यांनी मायक्रो फायनान्स व बचत गट यांच्या  सक्तीच्या वसुलीला स्थगिती दिली असूनही सांगोला तालुक्यांमध्ये मायक्रोफायनान्स व महिला बचत गटांच्या अधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखवली असून तालुक्यामध्ये सक्तीची वसुली सुरू आहे. याचा महिलांना त्रास होत असल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेना व महिला बचत गट यांच्या वतीने सोमवार दिनांक 9 नोव्हेंबर रोजी सांगोला तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष विनोद भाई बाबर यांनी दिली.

सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी दिनांक 13 ऑक्टोबर रोजी राष्ट्रीयीकृत बँका, मायक्रो फायनान्स बचत गट यांच्या सक्तीची वसुलीला स्थगिती देण्या संदर्भात परिपत्रक काढले होते परंतु जिल्ह्यात या परिपत्रकाची अंमलबजावणी करण्याऐवजी सदर बँका व मायक्रो फायनान्स व बचत गटाचे अधिकारी याची अवहेलना करत असल्याचे चित्र दिसत आहे. यामुळे संबंधित प्रशासनाने यावर तात्काळ निर्णय घ्यावा व सक्तीच्या वसुलीला स्थगिती द्यावी अन्यथा महिलांच्या न्यायासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना कायदा हातात घेईल असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष तथा मनसे सुरक्षा रक्षक दल चिटणीस विनोद भाई बाबर, मनसे महिला उपाध्यक्षा दिपालीताई बाबर, सांगोला तालुका उपाध्यक्ष कृष्णदेव इंगोले, वैशाली भोकरे, सतिष दिडवाघ, दत्तात्रय गायकवाड, अक्षय विभुते, साहेबराव सावंत, ऐवळे, ओंकार शिंदे, प्रवीण जाधव,आप्पासाहेब कर्चे ,अविनाश बनसोडे, अजिंक्य तोडकरी, विशाल गोडसे यांनी दिला आहे. तरी सक्तीच्या वसुलीच्या तगाद्याला त्रासलेल्या महिला बचत गटातील महिलांनी सोमवारी सकाळी ठीक 10 वाजता तहसील कार्यालया समोर हजर राहावे असे आवाहन महिला जिल्हा उपाध्यक्ष दिपालीताई बाबर यांनी केली आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments