राज्य सरकारच्या दडपशाहीचा मोहोळमध्ये निषेध सकल मराठा समाजाचे प्रशासनास निवेदन
मोहोळ ( क.वृ) :- जगाला आंदोलनाची दिशा देणाऱ्या सकल मराठा समाजाच्या पंढरपुर ते मंत्रालय,मुंबई आक्रोश मोर्चा वर सरकारने बंदी घालून,पंढरपूर शहरात संचारबंदी लागू केली असून पंढरपूरकडे जाणारी सर्व एसटी वाहतूक सरकारने दोन दिवस बंद ठेवली आहे. या निर्णयाचा निषेध करण्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने प्रशासनाला निवेदन देऊन संताप व्यक्त केला गेला.सरकारच्या या कृतीच्या निषेधार्थ मोहोळ शहर व तालुका सकल मराठा समाज,मराठा सेवा संघ,जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने तहसीलदार जीवन बनसोडे आणि पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांना निषेध पत्र देण्यात आले.
आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज यांचे वारसदार हे आपल्या न्याय व हक्कासाठी शांततेच्या मार्गाने आंदोलन करत असताना सरकार ज्याप्रकारे दडपशाही करत आहे,हे लोकशाहीला व स्वतंत्र भारताला शोभणारे नाही.महाराष्ट्रातील बारा कोटी जनतेमध्ये मराठा समाज सोडून सगळ्या समाजाला आरक्षण आहे.पण संघर्षाचा आमचा वारसा असून हे आंदोलन आरक्षण जोपर्यंत मिळत नाही.तोपर्यंत असेच चालू राहिल.सरकारने आपत्कालीन परिस्थिती चे गांभीर्य दाखवून या आंदोलनावर ज्याप्रकारे बंदी घातली आहे.ही बाब अतिशय निषेधार्ह आहे. महाराष्ट्रामधील छत्रपती शिवरायांचे आम्ही मावळे असून,आत्तापर्यंत आदोलन आम्ही शांततेतच केले असून,यापुढे मात्र सरकार जर अशी वागणूक देणार असेल, तर आम्हाला वेगळा विचार करावा लागेल .असेही या वेळी दिलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे.
यावेळी जेष्ठ मार्गदर्शक युवराज नाना गायकवाड, मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष मनोजकुमार मोरे,डॉ.प्रमोद पाटील, उपनगराध्यक्ष ,प्रमोद डोके,संतोष गायकवाड,शुभांगी लंबे,मोहिनी हावळे,प्रभाकर शिंदे, मोहोळ चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष प्रवीणनाना डोके, महेश गायकवाड, उदयोजक आकाश फाटे,राजेंद्र साठे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

0 Comments